बोरघाट, खंडाळा - रेल्वे पुलाच्या भरावाचे सुरू असलेले काम.
बोरघाट, खंडाळा - रेल्वे पुलाच्या भरावाचे सुरू असलेले काम. 
पुणे

बोरघाट जानेवारीपर्यंत सुरक्षित; दुरुस्ती वेगात

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - ‘लोणावळा ते कर्जत यादरम्यान बोरघाटात पुलाचा भराव खचल्याने रेल्वेच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारीपर्यंत बोरघाट सुरक्षित करू,’’ असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी व्यक्त केला.

लोणावळा, खंडाळा तसेच घाट परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने लोणावळा ते कर्जत यादरम्यान सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. ३ ऑक्‍टोबरला अप मार्गावरील रेल्वे किलोमीटर क्रमांक ११७ जवळ रेल्वेच्या बोगदा क्र. ४६ पुढील पुलाचा भराव खचला. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान पुणे-पनवेल पॅसेंजर व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विजापूर, पंढरपूर गाड्या अनिश्‍चित काळासाठी रद्द केल्या. तर हैदराबाद एक्‍स्प्रेस, कोयना, हुबळी, पनवेल-नांदेड, विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस या गाड्यांना पुण्यापर्यंतच थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड, पनवेल एक्‍स्प्रेस दर रविवारी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या वतीने घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीकामाच्या पार्श्वभूमीवर सुतार यांनी माहिती दिली. या वेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुख्य अभियंता एच. एस. चतुर्वेदी, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

मिडल आणि डाऊन लाइनवरील हानी भरून काढत अप मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. मात्र, गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

चौथ्या लाइनचा पर्याय
बोरघाटात अप, डाऊन आणि मिडल लाइनवरून रेल्वे वाहतूक होते. मात्र यंदा तिन्ही लाइनवरील वाहतूक विस्कळित झाली. सध्या घाटमार्गात चौथ्या लाइनचा पर्याय असून, त्यादृष्टीने रेल्वेचा विचार सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT