आळेफाटा, ता. ८ : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक व बोरी खुर्द येथील प्रागैतिहासिक वारसा, टेफ्रा साइट आणि अश्मयुगीन हत्यारे पाहून जपानमधील अभ्यासक डॉ. नॉरियाकी कानो व जनक कुमार मेहता भारावून गेले. मॅजिक टूर आणि पराशर कृषी व सांस्कृतिक पर्यटन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या स्थळांना भेट दिली.
डॉ. नॉरियाकी कानो हे जपानमधील टोकियो विद्यापीठाशी संबंधित शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत. भारतातील पुरातत्त्वीय वारसास्थळांच्या दौऱ्यात त्यांनी बोरीचा समावेश केला होता. या वेळी बोरी ग्रामस्थांनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था, बोरी बुद्रुक यांच्या वतीने जतन केलेली अश्मयुगीन हत्यारे, खापरांचे तुकडे, जुनी नाणी व पुरातन वस्तूंची माहिती त्यांना देण्यात आली. टेफ्रा साईटचे ऐतिहासिक महत्त्वही या वेळी विशद करण्यात आले.
पाहुण्यांनी पराशर कृषी व सांस्कृतिक पर्यटन केंद्रातील ग्रामीण वस्तुसंग्रहालय व माती संग्रहालयाची पाहणी करून महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या वारसा संवर्धनाच्या प्रयत्नांचे डॉ. कानो व मेहता यांनी कौतुक केले. बोरीतील वारसा जागतिक स्तरावर दखल घेण्याजोगा असून, त्याचे संवर्धन व पर्यटनाशी जोडणी केल्यास मोठे काम उभे राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वारसा संवर्धनासाठी विविध उपक्रम
पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था, बोरी बुद्रुकच्या वतीने बोरी महोत्सव, हेरिटेज वॉक, प्रदर्शन, परिसंवाद, शासकीय पातळीवर पाठपुरावा तसेच लोककला महोत्सव अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमुळे बोरीचा प्रागैतिहासिक व सांस्कृतिक वारसा व्यापक पातळीवर पोहोचण्यास मदत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.