पुणे

बॉस्को करंडक’ फुटबॉल

CD

येरवडा ः डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या नेल्सन पॉल स्मृती बॉस्को करंडक फुटबॉल स्पर्धेत खडकी ब्ल्यूज आणि आर्यन्स एफसी संघ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.
----------------

नॉईज बॉईज, खडकी ब्ल्युज, फाल्कन एफसी संघांची आगेकूच कायम
बॉस्को करंडक’ फुटबॉल

पुणे, ता. १४ ः येरवडा युनिटचे सेलेझियन को-ऑपरेटर्स, ‌‘सॅक्रिड हार्ड पॅरिश‌’ आणि येरवड्याच्या डॉन बॉस्को एज्युकेशनल कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेल्सन पॉल स्मृती ‘बॉस्को करंडक’ फुटबॉल स्पर्धेत नॉईज बॉईज, खडकी ब्ल्युज, फाल्कन एफसी ‘ब ’ या संघांनी आपली आगेकूच कायम राखली आहे.
येरवडा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नॉईज बॉईज संघाने फाल्कन्स एफसी ‘क ’संघाचा टायब्रेकमध्ये ४-२ अशा गोलने पराभव केला. नियोजित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये नॉईज बॉईजकडून दिनेश राठोड, प्रतीक शिंदे, निरंजन खुडे आणि उत्कर्ष आंम्रेने गोल केले तर फाल्कन्स एफसी संघाकडून सुनीत गुप्ते आणि शनुप नायर गोल करू शकले.
खडकी ब्ल्यूज संघाने आर्यन्स एफसी संघाचा टायब्रेकमध्ये ५-२ अशा गोलने पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी जोरदार खेळ केला. आर्यन्स संघाच्या सार्थक चौहानने खेळाच्या ३३ व्या मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली तर खेळाच्या ३९ व्या मिनिटास खडकी ब्लूजच्या शोएब सालमनीने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. नियोजित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये आर्यन्सकडून एकमेव गोल शरण घोडकेने केला तर खडकी ब्ल्युजकडून ॲश्ले व्हिन्सेंट, शोएब सालमनी, सनी ओव्हळ, व अथर्व कुमारने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
करण प्रजापती, अखिलेश रिकामे आणि युवराज गुरांगने केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर फाल्कन एफसी ‘ब ’संघाने हायलँडर्स एफसीचा ३-१ असा पराभव केला. पराभूत संघाकडून एकमेव गोल सिध्दार्थ इंगवलेने केला.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT