पुणे

'एमपीएससी'च्या परिक्षांबाबत झाला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना दिलासा

ब्रिजमोहन पाटील

पुणे ः "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा घेणे शक्य नसेल तर त्याचा निर्णय परीक्षेच्या तोंडावर जाहीर न करता लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना किमान मानसिक तरी दिलासा द्यावा अशा मुद्दा 'सकाळ'ने लावून धरला होता. अखेर त्यास यश आले आहे. एमपीएससीने अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. 

न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी "एमपीएससी'ने राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यामध्ये राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या तीन परीक्षांबाबत काय धोरण आहे याची विचारणा केली होती. त्यावर राज्य सरकारकडून लवकर निर्णय घेतला नाही, अखेर राज्य सेवा पूर्व परीक्षेला 72 तास शिल्लक असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अनेक विद्यार्थ्यांना राज्यसेवेची परीक्षा होणार असे वाटल्याने प्रवास करावा लागला होता पण परीक्षा रद्द झाल्याने परत घरी जावे लागले यात त्यांना आर्थिक भुर्दंड झाला तसेच मानसिक खच्चीकरण. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना कुठला निर्णय घ्यावा पण तो लवकर घ्यावा अशी भूमिका 'सकाळ'ने मांडली होती. त्यासंदर्भात विद्यार्थी व तज्ञांचे म्हणने देखील मांडले होते. राज्य सरकार  निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने  आयोगाने अभियांत्रिकी सेवा व अराजपत्रित गट-ब परीक्षा घेण्यासाठी तयारी पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले होते.
अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल 4 लाख 40 हजार ही परीक्षा विद्यार्थी देणार आहेत. त्यामुळे निर्णय लवकर घेणे गरजेचे होते.

याची दखल घेत शेवटी आयोगाने एक नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा व 22 नोव्हेंबर रोजी होणारी राजपत्रित गट ब ची परीक्षा पुढे ढकलली आहे परीक्षेचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे. सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय उशिरा घेतला असता तर राज्यात पुन्हा एकदा आंदोलने आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असती.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT