child abuse esakal
पुणे

आई कोणा म्हणू मी, कोणास म्हणू बाबा?

जिल्ह्यात २५ बालकांच्या दोन्ही पालकांचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

येरवडा : कोरोनामुळे गेल्या वर्षभरामध्ये आई आणि वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे पुणे जिल्ह्यात २५ मुले पोरकी झाली आहेत. त्यांचा सांभाळ सरकारी बालगृहे किंवा त्यांचे नातेवाईक करणार असले तरी त्यांच्या भावविश्‍वातील आई-बाबांची पोकळी कायम राहणार आहे. (Both parents of 25 children died due to corona in Pune district)

यासंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्‍विनी कांबळे म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षभरात कोरोनामुळे १०७२ बालकांचे आई किंवा वडिलांचे छत्र हरपले आहे. यातील २५ बालकांचे आई व बाबा अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील आठ मुलांना महिला व बाल विकासच्या बालगृहात दाखल केले आहे. तर ज्या बालकांची आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांची माहिती संकलित केली जात आहे.’’

या सर्व बालकांचे समुपदेशन करण्यात येत असून, गरजेप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. यातील आई किंवा वडील असलेल्या बालकांना बाल संगोपन योजने अंतर्गत दरमहा ११०० रुपये दिले जाणार आहे. सध्या राज्य व केंद्र सरकारच्या पोर्टलवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ऑनलाइन भरली जात आहे. त्यामुळे भविष्यात अशा मुलांसाठी चांगल्या योजना येतील. मुलांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात रक्कम देखील जमा होईल. यात शंका नाही. मात्र या मुलांच्या आई किंवा बाबांचे स्थान कोणी घेऊ शकणार नाही.

''कोरोनामुळे आईवडिलांचा मृत्यू झाल्यामुळे एकाच घरातील चार भावंडे अनाथ झाली आहेत. या भावंडांमध्ये दोन मुलगे व दोन मुली आहेत. याशिवाय इतर चार मुलींना बालगृहात दाखल केले आहे. यातील सर्वांत लहान मुल नऊ वर्षांचे, तर सर्वांत मोठी मुलगी दहावीत शिकत आहे. बालगृहात या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. त्यांना अठरा वर्षांपर्यंत बालगृहात ठेवले जाईल. मुलांचे शिक्षण, इतर व्यवसायभिमुख शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यात येईल.''

-अश्‍विनी कांबळे, महिला व बाल विकास अधिकारी,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT