पुणे

जन्मदात्या मुलाने दारूच्या नशेत आई, पत्नी व सख्ख्या भावाला केली मारहाण

डी. के. वळसे-पाटील

मंचर : जन्मदात्या मुलानेच दारूच्या नशेत आई .पत्नी व सख्ख्या भावाला मारहाण करून जखमी केल्याची घटना निरगुडसर-भराडी फाटा (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. 31) घडली आहे.

तुषार कोंडाजी खिलारी याने किरकोळ  भांडणाच्या कारणावरून दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. तिच्या मदतीसाठी आलेल्या आईला व सख्ख्या भावालाही कडप्पा फरशीने मारहाण करून दुखापत व घरातील सुमारे 45 हजार रुपयांचे.साहित्य पेटवून दिले आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तुषार खिलारीच्या  विरोधात   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार खिलारी त्याला दारूचे व्यसन आहे. पत्नी पूजा बरोबरकिरकोळ भांडण झाले. तिला मारहाण करून तापलेल्या स्टीलच्या कलथ्याने आई शांता खिलारी यांच्या हातावर जखम केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मदतीसाठी आलेल्या बंधू संतोष खिलारी यांनाही दुखापत केली. शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील अत्यावश्यक साहित्य पेटवून दिले. शांता खिलारी यांनी मुलगा तुषार खिलारीच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश खैरे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT