donar.jpgdonar.jpg
donar.jpgdonar.jpg 
पुणे

#FridayMotivation : तब्बल 53 दिवसांनंतर पुण्यात झाले पहिले अवयव प्रत्यारोपण

सकाळवृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्याने दान केलेल्या यकृतामुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळाले. राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. सगळेजण स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना विषाणूंचा संसर्गापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे.

त्यामुळे 23 मार्चनंतर पुण्यात एकही अवयव प्रत्यारोपण झाले नव्हते. तब्बल 53 दिवसांनंतर अवयव प्रत्यारोपण झाल्याची माहिती पुण्याच्या झोनल ट्रान्सप्लँट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नगरजवळील एका छोट्या गावात 11 मे रोजी झालेल्या अपघात 49 वर्षांच्या पुरुष गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबरी मार बसला होता. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठविण्यात आले. त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे ते कोमात गेले होते.

त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकष्टा केली. मात्र, रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितले. त्या वेळी मुलाने स्वतःहून अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. कोरोनाचा उद्रेक देशभर सुरू असताना आपली प्रिय व्यक्ती दान केलेल्या अवयवाच्या रुपात जिवंत राहावी, हा विचार करण्याला त्या मुलाला मनोमन सर्वांनी सलाम केला. 

रुबी हॉल क्लिनिकमध्ये तातडीने अवयव दानाची शस्त्रक्रिया करण्यात आली. दान केलेले यकृत नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयातील दात्याला प्रत्यारोपित करण्यात आले. त्यासाठी अवयव दान करणाऱया आणि प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या अशा दोघांचीही कोरोनाच्या संसर्गाची चाचणी करण्यात आली. या अवयव दानामुळे एका रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT