boy drowned while swimming in water of swimming pool pune
boy drowned while swimming in water of swimming pool pune  sakal
पुणे

पुणे : जलतरण तलावातील पाण्यात पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाच्या वाढत्या कडाक्‍यामुळे मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये घडली. गणेश पुंडलीक पाटोळे (वय 17, रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे. साठे नगर, महमदवाडी) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय असे तिघेजण रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या महापालिकेच्या भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते.

रेहानला पोहता येत नसल्याने तो कमी पाण्यामध्ये थोडावेळ थांबला, त्यानंतर तो पाण्याबाहेर आला. तर अजय व गणेश हे दोघेही नव्यानेच पोहायला शिकले असल्याने त्यांना पोहता येत होते. त्यामुळे ते दोघेही नेहमीपेक्षा यावेळी जास्त खोल पाण्यात उतरुन पोहत होते. दरम्यान, जलतरण तलावामधील पाणी गढूळ झाल्याने अजयला पोहताना त्रास होऊ लागला. त्यामुळे अजय काही वेळ पाण्यात पोहून बाहेर पडला. त्याने कपडे परिधान केले. त्यानंतर बराच वेळ होऊनही गणेश पाण्याबाहेर आला नाही. त्याचा जलतरण तलावामध्ये शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे अजय व रेहान या दोघांनी तत्काळ तेथील जीवरक्षकांना सांगितले. त्यांनी काही वेळाने जलतरण तलावामध्ये शोध घेतला, त्यांनाही गणेश आढळून आला नाही.

अखेर तलावातील पाणी कमी करण्यात आले. तेव्हा, गणेश पाण्यामध्ये बुडाल्याचे निदर्शनास आले. अजय, रेहान व जीवरक्षकांनी त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्यास रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

गणेश शाळेमध्ये हुशार

गणेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वडील सुरक्षारक्षक असून आई शेतामध्ये काम करते. त्यास छोटा भाऊ आहे. गणेशचे कुटुंब साठे नगर परिसरात राहते. गणेश हा साधना महाविद्यालयामध्ये अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. वर्गामध्ये तो हुशार होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT