12th Board Exam  sakal
पुणे

12th Board Exam : शिक्षक महासंघाकडून बहिष्कार कायम ; बारावी उत्तरपत्रिका तपासणी, पहिल्या टप्प्यातील बैठक नाही

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने टाकलेला बहिष्कार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने टाकलेला बहिष्कार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक होऊ शकलेली नाही.

बारावीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांची बैठक बुधवारी झाली नव्हती. तर गुरुवारी हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठकदेखील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे होऊ शकली नाही. राज्यामध्ये सहा ठिकाणी इंग्रजी विषयाच्या नियामकांच्या आयोजित केलेल्या बैठकीसुद्धा बहिष्कारामुळे होऊ शकल्या नाहीत, असे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी स्पष्ट केले. तसेच शुक्रवारी मराठी विषयाच्या मुख्य नियामकांची नियोजित बैठकसुद्धा शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे होऊ शकणार नाही, असेही आंधळकर यांनी स्पष्ट केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कोणत्याही अनुकूल हालचाली न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले. तर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांची तातडीची ऑनलाइन बैठक शुक्रवारी आयोजित केल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिली.

‘‘कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गप्प न बसता तातडीने शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात,’’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनाही सहभागी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या सूचनेप्रमाणे बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारात सहभागी झाल्याचे निवेदन पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्ष मंजूषा मिसकर, सचिव औदुंबर उकिरडे आणि सहायक सचिव मीनाक्षी राऊत यांना देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण रोडे, उपाध्यक्ष प्रा. बी. आर. घोडके, कार्याध्यक्ष डॉ. तुकाराम साळुंखे, प्रा. सुंदर लोंढे, प्रा. पृथ्वीराज जाधव, प्रा. गंगाधर घाटगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT