Boyfriend stabbed to death by girlfriend in Wagholi pune crime news  esakal
पुणे

Pune Crime News : पुणे हादरले! वाघोलीत भाजी चिरण्याच्या चाकूनं प्रियकराची हत्या

रोहित कणसे

पुणे : प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली भागात प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही मागील काही महिन्यांपासून वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संबंधित प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या सर्वांगावर वार केल्याचे दिसून आले. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता

संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT