पुणे

ब्राम्हणवाड्यात रास्ता रोकोनंतर आमरण उपोषण अवैध दारूविक्री, रस्ते आणि जलजीवन मिशनच्या कामांवरून ग्रामस्थ आक्रमक

CD

ब्राह्मणवाड्यात ग्रामस्थांचा रास्तारोको
अकोले, ता. २४ : अवैध दारूविक्रीला आळा घालावा, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी ब्राह्मणवाडा ग्रामस्थांनी आज रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर उपोषण सुरू केले.
गावात दारूबंदी असतानाही अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच राज्य मार्ग क्रमांक २३, ओतूर-ब्राह्मणवाडा आणि कोतूळ-ब्राह्मणवाडा मार्गाची दुरवस्था झाली असून, रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
जलजीवन मिशनअंतर्गत ब्राह्मणवाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
उपसरपंच सुभाष गायकर, शिवाजी आरोटे, राज गवांदे, रेश्मा गोडसे, चंद्रकांत गोंदके, हेरंब कुलकर्णी आदींनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, काही अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले; मात्र मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

Hospital Fire: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूने भंडाऱ्याची ‘ती’ काळरात्र पुन्हा ताजी; २०२१ मध्ये १० बालकांचा आगीत मृत्यू

SCROLL FOR NEXT