Brain 
पुणे

मेंदूच्या समस्यांवर ‘ब्रेननेक्‍स्ट’चा उपाय

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वेगवेगळ्या कारणांनी मेंदूला होणारी इजा तसेच आजारांमुळे स्मरणशक्ती व आकलन कार्यक्षमतेच्या समस्या उद्‌भवत असल्याचे तुम्ही अवतीभवती पाहिले असेल. अशा समस्यांवर नेमके कोणतेही रामबाण औषध नसते. दीर्घकालीन पुनर्वसन, हाच यावरचा सर्वोत्तम पर्याय. याच शास्त्रीय आधाराचा वापर करून ‘ब्रेननेक्‍स्ट टूल किट’ तयार करण्यात आले 
आहे.

रुग्णाच्या पुनर्वसनासाठी ‘ब्रेननेक्‍स्ट टूल किट’मध्ये पाचशे प्रकारचे मेंदूचे व्यायाम आहेत. त्यासाठी १८ संच निर्माण केले आहेत. रुग्णाची स्मरणशक्ती व बौद्धिक कार्यक्षमता यात अचूकपणे ओळखता येते. तसेच, त्यातील तूट भरून भरून काढण्यासाठी ‘ब्रेननेक्‍स्ट’ची भूमिका महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे ‘ब्रेननेक्‍स्ट’ म्हणजेच स्मरणशक्ती व आकलनक्षमता केंद्र संचेती हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आले आहे. पुण्यातील हे अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे. अपस्मार, अल्झायमर, स्ट्रोक, मायग्रेन, मेंदू विकासात्मक विकार, त्याचे दुर्मीळ संसर्ग व आजार, मेंदूला झालेली इजा व त्यामुळे झालेला आघात, पार्किंसन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांमुळे स्मरणशक्ती व मेंदूच्या आकलन कार्यक्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. 

या आजारांकरिता नेमके कुठलेही औषध नसल्याने रुग्णांचे दीर्घकालीन पुनर्वसन करणे हाच पर्याय आहे. त्यासाठी ‘संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्‍स अँड रिहॅबिलिटेशन’तर्फे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मंगल कर्डिले यांच्या सहयोगाने केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ‘ब्रेननेक्‍स्ट’ संकल्पनेला ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी’ची मान्यता मिळाली असल्याची माहिती ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT