पुणे

पुणे- मुंबई रेल्वे सेवेला ''ब्रेक''

CD

पुणे- मुंबई रेल्वे सेवेला ‘ब्रेक’
प्रगती एक्स्प्रेससह डेक्कन क्वीन रद्द
पुणे, ता. १५ ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील क्रमांक १० आणि ११ या दोन फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार असल्याने रेल्वे प्रशासनाने ‘सीएसएमटी’ स्थानकावर येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या दादरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यात पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ''एमएसटी'' धारकांसह सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

या गाड्या रद्द :
- पुणे - मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (ता. २८मे ते २ जून )
- पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (ता. ३१ मे ते २ जून )
-पुणे- मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )
- पुणे- मुंबई -पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )
-कुर्ला - मडगांव - कुर्ला (ता. १ व २ जून )
----------
या गाड्या दादर पर्यंत धावणार :
- साई नगर शिर्डी - मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
- भुवनेश्वर - मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
- हैदराबाद - मुंबई - हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस
- होस्पेट - मुंबई - होस्पेट एक्स्प्रेस
- मुंबई -चेन्नई - मुंबई चेन्नई एक्स्प्रेस
(वरील रेल्वे १७ ते २७ मे दरम्यान दादर स्थानकापर्यंत धावतील. परतीचा प्रवास दादर येथूनच सुरवात करतील. )
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Jalgaon News : जळगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला युद्धाची झळ! कच्चा माल मिळेना, उत्पादन निम्म्यावर आल्याने उद्योजक चिंतेत

२३ वर्षे डावललं! ‘टॉस, प्रेझेंटेशनमधून मला बाजूला ठेवलं’; रवी शास्त्री याचं नाव घेऊन माजी खेळाडूचा संताप

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

Ardhapur News : अर्धापूरात गारपीट-वादळी वाऱ्याचा तडाखा; ८ गावांतील २५० हेक्टर शेती बाधित, प्रशासनाची पाहणी

SCROLL FOR NEXT