Floressence Perfumes Pvt Ltd
Floressence Perfumes Pvt Ltd 
पुणे

फ्लोरोसेन्स पर्फ्युमस प्रायव्हेट लिमिटेड : ‘स्मार्ट’ करणार तुम्हाला सॅनिटायझर

सकाळवृत्तसेवा

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचं महत्त्व गेल्या सहा महिन्यांमध्ये ठळकपणे समोर आले आहे. देशात कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्यापासून स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुणे, ते निर्जंतुक करणे याचा संदेश आरोग्य खाते देत आहे. याच राष्ट्रीय कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी ‘फ्लोरोसेन्स परफ्युम्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी पुढे आली आहे. आत्तापर्यंत जगातील प्रमुख देशांना आपल्या परफ्युम्सच्या सुगंधाने दरवळून टाकणारी ही कंपनी आता ‘डिरिओ हँड सॅनिटायझर स्प्रे’ आणि ‘स्मार्ट सरफेस डिसइन्फेक्टंट स्प्रे’ भारतीयांसाठी तयार करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये परफ्युम निर्यात करणारी ही कंपनी या उद्रेकाच्या काळात प्रत्येक भारतीयाला मदतीचा हात देण्यासाठी पुढे सरसावली आहे. कोरोना उद्रेक झाल्यानंतर तातडीने पावले टाकत कंपनीने हँड सॅनिटायझरच्या उत्पादनाला सुरुवात केली. या उत्पादनासाठी आवश्यक परवानगी केंद्र सरकारने तात्काळ दिली. त्यामुळे देशातील नागरिकांसाठी सॅनिटायझर तयार करता आले, असे ‘फ्लोरोसेन्स परफ्युम्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक दानेश सयानी यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘आम्ही परफ्युम्स निर्यात करतो. निर्यातक्षम गुणवत्ता हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

त्यामुळे हाच सर्वोत्तम दर्जा घेऊन ‘स्मार्ट’ आणि डिरिओ या ब्रँडच्या नावाने आम्ही सॅनिटायझर खास भारतीयांसाठी घेऊन आलो आहोत. याचे पॅकेजिंग आणि त्याची गुणवत्ता निर्विवाद सर्वश्रेष्ठ आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी चांगल्या दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि सरफेस डिसइन्फेक्टंट स्प्रे उपलब्ध करून देणे ही आताच्या काळाची गरज आहे.’

कंपनीने भारतीयांसाठी सध्या सॅनिटायझर उपलब्ध केले असले तरीही अगदी थोड्याच दिवसांमध्ये एअर फ्रेशनर्स, परफ्युम्स आणि डिओड्रंट ही उत्पादने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होतील. अर्थातच, ही सर्व उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची असतील. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू विराट कोहली यांचा वन ८ आणि दिग्गज अभिनेता सलमान खान यांचा ‘फ्रेश’ डिओचे उत्पादन फ्लोरोसेन्समध्ये केले जाते. आमच्या उत्पादनाची गुणवत्ता निर्विवाद आहे. निर्यातक्षम गुणवत्ता आता भारतीयांसाठी मिळणार आहे. तेही प्रत्येक भारतीयांना परवडेल, ते सहजतेने खरेदी करता येईल अशा किमतीमध्ये ही उत्पादने आहेत. त्याची सुरुवात अगदी एक रुपयापासून होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

फ्लोरोसेन्स परफ्युम्स प्रायव्हेट लिमिटेड
+९१ ७५५८३५४४४६६

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT