Maharashtra-Education-Society
Maharashtra-Education-Society 
पुणे

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स - शा‍स्त्रीय गायन, नृत्य, नाट्य शिक्षणाची संधी

सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ‘कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असून ‘बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ (बी.पी.ए.) हा पदवी अभ्यासक्रम शिकविणारे पुणे शहरातील पहिले आणि एकमेव महाविद्यालय आहे. कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बी.पी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. चार वर्षे कालावधीच्या या पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि नाट्य या तिन्हीपैकी एका विषयाची निवड करू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविद्यालयाने आत्तापर्यंत अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) आणि मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्यलेखन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ९० दिवसांच्या या कार्यशाळेसाठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरचे कलाकार मार्गदर्शक म्हणून लाभले. अशाचप्रकारे पं. विकास कशाळकर यांची ‘संगीतातील घराणे आणि सादरीकरण’ याविषयावरील कार्यशाळा, ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार यांचे ‘नाट्यसंगीतातील परंपरा आणि आविष्कार’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान, ज्येष्ठ कथक नर्तक व गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते. याशिवाय, सुप्रसिद्ध अभिनेता श्री. योगेश सोमण यांची ‘स्वराभिनय’ विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात गेल्या एप्रिल व मे महिन्यात ‘परफॉर्मिंग आर्ट्स’बाबत मार्गदर्शन करणारी ९ ऑनलाइन सत्रे घेण्यात आली.

अशाप्रकारे, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीसाठी पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते. थेअरी व प्रात्यक्षिक अशा पारंपरिक शिक्षणाबरोबरच साऊंड लायब्ररी, रेकॉर्डिंग स्टुडिओ, प्रोजेक्टर रूम, प्रॅक्टिस रूम, सभागृह, फेलोशिप मार्गदर्शन केंद्र इत्यादी अभ्यासपूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमित प्राध्यापक वृंदाबरोबरच संबंधित अभ्यासविषयातील तज्ज्ञ कलाकार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिथी प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. 

कलेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, त्यांच्यापुढील आव्हाने आणि उपलब्ध संधी या सर्वांचा सुरुवातीपासून केला गेलेला विचार, या महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. 

‘मएसो भवन’, १२१४-१५, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
Contact : ०२०-४१०३८१५७/५८, +९१ ९०११०९०७१५
Email : enquiry.bpa@mespune.in   
Website : performingarts.mespune.in

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT