Mittal-Astrology 
पुणे

मित्तल ॲस्ट्रोलॉजी : ज्योतिषशास्त्र विषयात एक विश्वसनीय नाव

सकाळवृत्तसेवा

शैक्षणिक क्षेत्रातील करिअर असो किंवा पत्रिका जुळवणे अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी ज्योतिष शास्त्रामधील तज्ज्ञांची मदत घेणे हे पूर्वीच्या लोकांपासून हल्लीच्या यांत्रिक युगातही कायम आहे. ‘मित्तल ॲस्ट्रोलॉजी’चे नाव ज्योतिष शास्त्रात नेहमीच अग्रस्थानी असते. संस्थेने गेल्या चाळीस वर्षांमध्ये अडीच लाखांहून अधिक लोकांचे असे समाधान केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री. शशिभूषण मित्तल यांनी चाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. निरंजन मित्तल चालवीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटीज, ख्यातनाम खेळाडू, उद्योगपती आदी लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे कार्य केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून अमेरिका, युरोपियन देश, हाँगकाँग, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आखाती देश आदी देशांमधूनही विविध क्षेत्रातील लोक आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. डॉ. निरंजन मित्तल यांनी परदेशात या कामानिमित्त दौरे केले आहेत आणि ज्योतिष विषयक व्याख्याने ही दिली आहेत. ते नक्षत्र, ग्रहांची स्थिती, विशोत्तरी दशा, व बारावे स्थाने याबाबत सखोल अभ्यास करूनच ज्योतिष विषयक मार्गदर्शन करतात.

ग्रहांची अनुकूल व प्रतिकूल स्थिती केव्हा असेल, क्लेशदायक काळ केव्हा असेल, त्यावर कोणती उपाययोजना करावी याबाबतही ते योग्य सल्ला देत असतात. ज्योतिष शास्त्र विषयांमध्ये त्यांनी विद्यावाचस्पती पदवी मिळवली असून रत्नशास्त्र या विषयाचा ही त्यांनी विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्यांना रत्नशास्त्राद्वारे वेगवेगळे उपाय सांगतात. या लोकांचे समाधान हीच डॉ. निरंजन मित्तल यांच्या दृष्टीने कामाची पावती असते. अनेक लोक त्यांच्याकडे घर खरेदी करण्यापूर्वी, बांधण्यापूर्वी सल्ला घेण्यासाठी येत असतात. त्यांनाही डॉ. निरंजन मित्तल योग्य मार्गदर्शन करतात.

डॉ. निरंजन मित्तल यांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ज्योतिष शास्त्राची परंपरा प्राचीन काळापासून आहे. आकाश निरीक्षणाबाबत माहिती घेण्यासाठी आत्ता असलेली आधुनिक उपकरणे नव्हती. तरीही तेव्हापासून असलेली ज्योतिष शास्त्राची परंपरा अजूनही यांत्रिक युगात कायम राहिली आहे. अजूनही लोकांचा त्यावर प्रचंड विश्वास आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये ज्योतिषशास्त्रास मोठी मागणी आहे.

वास्तुशास्त्राच्या अभ्यासाची जोड देत भविष्य सांगण्याबाबत डॉ. निरंजन मित्तल आग्रही असतात. डॉ. निरंजन मित्तल यांनीही आपल्या वडिलांनी या क्षेत्रात मिळविलेला नावलौकिक कायम ठेवला आहे आणि स्वतःचीही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. देशात व परदेशात अनेक ठिकाणी ज्योतिष शास्त्राविषयी आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानमाला आणि परिसंवादात व्याख्याते म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. एवढेच नव्हे फोर्ब्ज इंडिया नियतकालिकानेही डॉ. निरंजन मित्तल यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध केला होता. तसेच अन्य वृत्तपत्रांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

मार्गदर्शनाची क्षेत्रे : शिक्षण, करिअर, आर्थिक प्रगती, विवाह- वैवाहिक जीवन, आरोग्य स्थिती, संभाव्य अडचणी आदींबाबत वैयक्तिक मार्गदर्शन जन्मपत्रिका तयार करणे, सविस्तर पत्रिका जुळवणे, रत्नांची पारख करून त्याबाबत मार्गदर्शन करणे.

वेगवेगळ्या सन्मानाचे मानकरी : ज्योतिष आणि वास्तू शास्त्रामधील राष्ट्रीय नैपुण्य पुरस्कार (२०१७-१८) आंतरराष्ट्रीय आयकॉन पुरस्कार व सर्वोत्कृष्ट ज्योतिष तज्ज्ञ (२०१९-२०) या पुरस्काराचे वितरण ख्यातनाम सिनेतारका मलाइका अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले होते.

संपर्क - ९८२२४४२५२५
www.mittalastrology.in
Instagram : @mittalastrology

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT