Pune BJP Esakal
पुणे

Pune BJP : कसबा निवडणुकीत भाजपकडून आचारसहिंतेचा भंग

आचारसंहितेच्या काळात भाजपाकडून कसबा मतदारसंघात भाजपाचे चिन्ह असलेले झेंडे दिसून आले

सकाळ डिजिटल टीम

कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या दिवसापासून पुणे आणि चिंचवडमध्ये आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. असे असताना आचारसंहितेच्या काळात भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक कसबा मतदारसंघात भाजपाचे चिन्ह असलेले झेंडे दिसून आले आहेत.

दरम्यान प्रशासनाने यावर अजूनपर्यंत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कसबा मतदारसंघा आचारसंहिता जाहिर झालेली असताना पक्षाचे झेंडे झळकत आहेत. आचार संहिता सुरू असताना झेंडे लावले असताना कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.

पुणे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या दोन जागांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्ष आपले उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी बैठका, गाठीभेटी वाढल्या असून या पोटनिवडणुका चुरशीच्या होणार असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT