मंदिरात दानपेटीतून चोरी करताना चोर. Sakal
पुणे

मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व इतर ऐवज लंपास

चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; चौथ्यांदा दानपेटी फोडल्याने किरकटवाडीतील नागरिक संतप्त

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथील मारुती मंदिरातील दानपेटी फोडून एका अज्ञात चोरट्याने मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह इतर ऐवज लंपास केला आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली ही चोरीची पूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. दानपेटी फोडून चोरी होण्याची ही चौथी वेळ असल्याने व पोलीसांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

किरकटवाडी गावातील मुख्य चौकात असलेल्या मारुती मंदिरात सकाळी काकड आरती करण्यासाठी नागरिक आले असता त्यांना मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलुप तोडलेले दिसले.आत जाऊन पाहिले असता दानपेटीही फोडलेली दिसली. नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक अनोळखी चोर दरवाजा तोडतानाची व दानपेटीचे कुलुप कटावणीने तोडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दानपेटीतून बाहेर काढत असल्याची संपूर्ण घटना दिसून आली. याबाबत दशरथ करंजावणे व विजय हगवणे यांनी हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मंदिरात पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

दानपेटी फोडण्याची चौथी वेळ

किरकटवाडी येथील याच मारुती मंदिरात असलेली दानपेटी फोडून चोरी होण्याची ही चौथी वेळ आहे. महत्वाचे म्हणजे एकदा ग्रामस्थांनी चोरांना पकडून हवेली पोलीसांच्या ताब्यात दिले होते परंतु त्यावेळी पोलीसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक गावामध्ये रात्रीची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT