पुणे

बहुपक्षीय सहकार्याची गरज ःजयशंकर

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १४ ः ‘‘जग अभूतपूर्व भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळातून जात असून, संघर्ष, हवामान बदल, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि वाढती आर्थिक असमानता यामुळे विकसनशील देशांपुढील आव्हाने अधिक गंभीर बनली आहेत. अशा परिस्थितीत ब्रिक्स देशांनी अधिक समन्वित आणि रचनात्मक भूमिका बजावावी,’’ असे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज केले.
‘ब्रिक्स’ परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलताना जयशंकर यांनी ‘ब्रिक्स’ देशांची एकजूट अधोरेखित केली. ऊर्जा, अन्न आणि खत सुरक्षेवरील दबाव, पुरवठा साखळीतील अडथळे, चलनवाढ आणि विकास प्रक्रियेवरील मर्यादा यांचा सर्वाधिक फटका उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांना बसत असल्याचे सांगताना जयशंकर यांनी ‘ब्रिक्स’ देशांची एकजूट आणि सामूहिक कृती अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया राहिला पाहिजे. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच संघर्ष सोडवण्याचा शाश्वत मार्ग आहे, अशी अपेक्षा व्यक्त करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीचा संदर्भ देत जयशंकर यांनी सततचा तणाव, सागरी वाहतुकीवरील धोके आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील परिणाम यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रासारख्या महत्त्वाच्या जलमार्गांमधून सुरक्षित आणि निर्बंध सागरी वाहतूक सुरू राहणे जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक असल्याची आग्रही भूमिका मांडली.

‘शून्य सहिष्णुता’
दहशतवादाबाबत ‘शून्य सहिष्णुता’ हेच जागतिक धोरण राहिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. त्याचप्रमाणे बहुपक्षीय व्यवस्थेची क्षमता कमकुवत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली.


जयशंकर यांचे मुद्दे
- गाझामधील संघर्षामुळे गंभीर मानवी संकट निर्माण झाले
- पॅलेस्टाईन प्रश्नावर भारताने द्वि-राज्य तोडग्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार
- लेबनॉन, सीरिया, सुदान, येमेन आणि लिबिया या देशांतील परिस्थितीबाबतही चिंता
- दहशतवाद हा अजूनही जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका
- कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला समर्थन देता येणार नाही
- सीमापार दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन
-

..

पूर्ण... अजय बुवा. १४ मे २०२६... वेळ ३.४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT