पुणे

हेड देशांतर्गत व्यापारातील अडथळे दूर करावेत

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ११ ः ‘‘तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणाऱ्या ‘ब्रिक्स’ संघटनेने देशांतर्गत व्यापारातील दहा प्रमुख अडथळे दूर करावेत.  दरवर्षी शंभर ब्रिक्स स्टार्टअपना इतर बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी मदत करावी तसेच  आपल्या व्यवसायांमध्ये शंभर नवीन भागीदाऱ्या विकसित कराव्यात,’’  असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान  यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या  ब्रिक्स व्यावसायिक परिषदेला मार्गदर्शन करताना केले.
‘‘दोन दशकांपूर्वी चार देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ब्रिक्स संघटना आज २१ देशांचे कुटुंब बनले असून भारतामध्ये आयोजित ‘ब्रिक्स’ परिषदेचे व्यासपीठ सर्वांत मोठा व्यावसायिक मंच ठरला आहे. ही वेळ ‘ब्रिक्स’च्या महत्त्वाकांक्षेला कृतीमध्ये आणि एकत्रित ताकदीचे जागतिक उपायांमध्ये परिवर्तित करण्याची आहे,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘‘आज ‘ब्रिक्स’ देशांमध्ये जगातील ५० टक्के लोकसंख्या असून ४० टक्के जीडीपी आणि २५ टक्क्यांहून अधिक व्यापार होत आहे. ‘ब्रिक्स’ची आर्थिक ताकद जगाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढली आहे.  ब्रिक्स देश जागतिक नवोपक्रम आणि उपायांसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत,’’ असेही त्यांनी नमूद केले.


पुतीन म्हणाले...
- रशियाला डॉलर सोडण्यास बाध्य करण्यात आले पण  आर्थिक निर्बंधांनंतरही रशियाची आगेकूच कायम राहिली. रशिया आता आपल्या सहकारी देशांसोबत ९५ टक्के व्यापार राष्ट्रीय चलनात करीत आहे. 

- पाश्चात्त्य देशांचे जुने जागतिक नेते आता विकासाच्या नव्या इंजिनांमुळे वर्चस्व गमावत आहेत.  ‘जी-७’ ला ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ का म्हणतात? हे आपल्याला कळत नाही.

- जागतिक ‘जीडीपी’मध्ये ब्रिक्स देशांचा ४० टक्के वाटा आहे, तर ‘जी-७’ देशांचा वाटा केवळ २९ टक्के राहिला आहे. जगाच्या आर्थिक विकासातही ब्रिक्स देशांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे, तर ‘जी-७’ देशांचे योगदान १८ टक्के आहे.

पेझेश्कियान म्हणाले....
- ‘‘ब्रिक्स’ची खरी ताकद ही सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या आकारात नसून, ती आर्थिक क्षमतेमध्ये आहे. व्यापार, गुंतवणूक आणि संयुक्त वित्त पुरवठ्यासाठी त्याचा वापर होतो. ‘ब्रिक्स’ने प्रत्यक्ष सहकार्याच्या दिशेने वाटचाल करावी.

- सध्या जग हे भू-राजकीय अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आर्थिक साधनांचा राजकीय दबावासाठी वाढता वापर अशा आव्हानांना सामोरे जात आहे. ‘ब्रिक्स’ देशांनी या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मोठी बातमी! देशातील टोलनाके होणार बॅरियरमुक्त; नितीन गडकरींची घोषणा, काय आहे नवीन प्रणाली?

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महत्त्वाची बातमी! UPSC EPFO साठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात अटकेचा आकडा १२ वर; आमदारपुत्र रोहित गावीत, निलंबित युवासेना प्रमुख साईराज पाटील पोलिसांच्या ताब्यात

FDA Crime : भेसळीच्‍या संशयाने ३८ लाखांचा खवा, पनीर जप्त; ‘एफडीए’ची पेठेत कारवाई

SCROLL FOR NEXT