पुणे

भारत-इराणमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली, ता.२२ ः दिल्लीमध्ये आयोजित सोळाव्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या  पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल  आणि इराणच्या  सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे  संरक्षण विषयक उपसचिव गदिर नेझामीपोर यांची आज चर्चा झाली. या बैठकीदरम्यान दोवाल आणि  चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचीही द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 
ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद यंदा भारत भूषवित आहे. उद्या (ता.२३)  अजित दोवाल यांच्या अध्यक्षतेखाली  गुरुग्रामच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, रशियाचे सुरक्षा परिषद सचिव सर्गेई शोईगु आणि नेझामीपोर यांच्यासह ब्रिक्स देशांचे  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भाग घेणार आहेत. सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या ब्रिक्स शिखर  परिषदेच्या तयारीवर या बैठकीची चर्चा केंद्रित झाली असून त्यात जगाला भेडसावत असलेल्या अपारंपारिक सुरक्षा धोके, सीमापार दहशतवाद आणि त्या विरोधात सहकार्य, पश्चिम आशियामधील पेचप्रसंग, जागतिक आव्हाने, नवतंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आदी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल. भारताकडून पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित आहे.  भारताकडून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा  मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित आहे. 
दोवाल आणि नेझामीपोर यांच्यात आज झालेल्या चर्चेत  पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ब्रिक्स व्यासपीठा अंतर्गत  सहकार्य तसेच भारत-इराण द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours: यशस्वी जैस्वालसोबत डेटिंगच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं मौन अखेर तुटलं; म्हणाली, “Gen Z...”

Solar Scheme Scam: पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांहून अधिकांची फसवणूक; राजेंद्र बोहाडेवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

SCROLL FOR NEXT