Bride-Dance
Bride-Dance 
पुणे

'मेरे सैंया सुपरस्टार''गाण्यावर थिरकत स्वत:च्याचं लग्नात नाचली नवरी; व्हिडिओ व्हायरल

सकाळवृत्तसेवा

ओतूर - पारंपरिक पद्धतीने सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात वधू-वरांचे मंडपात आगमन होते. परंतु, याला फाटा देत उदापूर (ता. जुन्नर) येथे वधूने नृत्य करत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने बोहल्यावर आगमन केले. तिच्या अदाकारीने वराबरोबर उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निरगुडे (ता. जुन्नर) येथील चंद्रकला ज्ञानेश्वर ताजणे यांची कन्या श्वेता व उदापूर येथील अरुणा आदिनाथ शिंदे यांचा मुलगा संकेत यांचा शुभविवाह बनकरफाटा येथील शिंदे कुटुंबाच्या सद्गुरू कृपा निवास येथे आयोजित केला होता. मुहूर्ताच्या अगोदर वधू वराच्या आगमनाची वऱ्हाडी मंडळी वाट पाहत होते. मात्र, वर (नवरा) मंचावर एकटाच होता. परंतु, वधू कोठेच दिसत नव्हती. त्यामुळे मंडळीची उत्सुकता वाढली अशातच स्पीकरवर हिंदी गाणे सुरू झाले. मेरे सैया सुपरस्टार आणि नाचत नाचत मांडवातून वधू मंचाकडे जाऊ लागली, वधूचे आकर्षक नृत्य पाहून वऱ्हाडी मंडळी बरोबरच नवरा मुलगा सुद्धा तिला प्रोत्साहन देऊ लागला. या नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. थोड्याच कालावधीत हे नवदाम्पत्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.

याबाबत श्‍वेता म्हणाली, 'लग्न हा आनंदाचा क्षण असून दुसऱ्याच्या लग्नात तर सर्वच नाचतात. आपण आपल्याच लग्नांमध्ये नाचून आनंद व्यक्त केला. तर यात हरकत काय आहे. माझ्या या कृतीला माझ्या पतीबरोबरच माझ्या सर्व कुटुंबाने उत्साहाने साथ दिली. माझ्या मैत्रिणीने हा व्हिडिओ काढला.'

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT