bridge 
पुणे

इंद्रायणीवरील पूल कोसळला, मोठा अनर्थ टळला कारण काहीवेळापूर्वीच...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पुल आज सकाळी सहाच्या सुमारास कोसळला. नदीपात्रात खोल पाणी असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासत आहेत. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस गेल्यानंतर पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

इंद्रायणी नदीवरील आंबी येथील पुलावरुन तळेगाव एमआयडीसीकडे रोज शेकडो वाहने ये जा करतात. बंदी असूनही डंपर आणि इतर अवजड वाहने सर्रास चालू होती. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी अवजड वाहनांसाठी लावलेले अडथळे अज्ञात वाहतुकदारांनी जेसीबीने तोडून टाकले. त्यानंतर वारंवार विनंती अर्ज करुनही सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस अवजड वाहतुक रोखू शकले नाहीत. परिणामी आज सोमवारी (ता.१६) सकाळी सहाच्या सुमारास पुलाच्या ऐन मधलया मोरीवरील स्लॅब नदीपात्रात कोसळला. अचानक झालेल्या मोठया आवाजाने भयभीत गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. वाहने आडवी लावून इशारा देत वाहतुक थांबवण्यात आली आहे. माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी पुलाकडे धाव घेत बंदोबस्त लावला.

प्रत्यदर्शीच्या म्हणण्यानुसार, सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नसली तरी. नदीपात्रात खोल असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत. विशेष म्हणजे ऑगस्ट २०१६ मध्ये कोकणातील सावित्री नदी पुल दुर्घटनेवेळी, आंबी येथील पुलाची तत्कालीन तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करुन पुल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.स्वातंत्र्योत्तर काळात बांधला गेलेला हा पुल चाळीस वर्षाहून अधिक जुना होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT