पुणे

पुण्यातील लाखणगाव येथील पुल बनला वाहतुकीसाठी धोकादायक, कारण...

सुदाम बिडकर

पारगाव : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवर असलेल्या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे गेल्या दोन तीन वर्षापासून गायब झाले आहेत. हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार मागणी करुनही अद्यापही कठडे बसविण्यात आले नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाला एकांदी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का असा सवाल नागरिक उपस्थीत करत आहे.

लाखणगाव येथुन जाणार्या बेल्हा जेजुरी रस्त्यावर हा पुल आहे. या पुलाला 24 वर्ष पुर्ण झाली असून, 1996 साली सुमारे 39 लाख रुपये खर्च करुन हा पुल बांधण्यात आला आहे. या पुलाची उंची व रुंदीही कमी आहे पावसाळ्यात घोडनदीला पुर आल्यास अनेकदा या पुलावरुन पाणी जाते. या पुराच्या पाण्याने पुलाचे कठडेही वाहुन जातात परंतु गेली दोन ते तीन वर्षापासून या पुलाला पच्छिमेच्या बाजुला कठडेच नाहीत.

पुलाच्या पुर्वेला जवळच बंधारा असल्यामुळे या ठिकाणी नदीत बाराही महीने भरपुर पाणी असते. या पुलामुळे जुन्नर, शिरुर व आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावे जोडली गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. भीमाशंकर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुर असताना ऊस वहातुक करणारी वाहनेही याच पुलावर जात असतात पुलाला कठडे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे.

पुलाला कठडे नसल्याने प्रवाशांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून या ठिकाणावरून प्रवास करावा लागत आहे. खरंतर या ठिकाणी बेल्हे जेजुरी हा नव्याने महामार्ग स्थापित होत असून, या पुलाचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या कसरतीने या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या कामात ही सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले जात असून ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, अशा ठिकाणी सुरक्षेच्या नियमाची कुठेही बॅरिकेट अथवा फलक लावलेला दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी याकडे लक्ष देऊन तातडीने या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन करुन पुलाला संरक्षण कठडे बसवावेत अशी मागणी लाखणगावच्या सरपंच प्राजक्ता शिरिषकुमार रोडे यांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT