bridge 
पुणे

पुणे : धायरी फाट्यावरील पुलाला तडे नसून ती सांधेजोड!

विठ्ठल तांबे

पुणे : धायरी फाटा येथील स्वर्गीय रमेश वांजळे उड्डाण पुलाला तडे नसून उड्डाण पुलाच्या स्लॅबच्या विशिष्ट लांबी एवढेच सिमेंट काँक्रीटचे सरंक्षक कठडे आहेत. या उड्डाण पुलाला पाच ठिकाणी उड्डाण पुलाच्या स्लॅबची व सरंक्षण कठड्याची तांत्रिकदृष्टया सांधेजोडणीमध्ये साधारण एक इंचाचे अंतर आहे. या अंतरामुळे संरक्षक कठड्याला व पुलाला कसल्याही प्रकारचा धोका नाही.

सकाळ संवाद सदारामध्ये 25 नोव्हेंबर 2018 मध्ये धायरी उड्डाण पुलाला तडे या आशयाची बातमी आली होती. परंतु, सकाळने सखोल चौकशी करून प्रत्यक्षात निरीक्षणाअंती खूपच विरोधाभास असल्याचे जाणवले. संबंधित विषयाच्या संदर्भात काही सामाजिक कार्येकर्त्याना व या क्षेत्रांशी निगडीत असलेल्या जाणकारांना प्रत्यक्ष नेऊन ज्या ठिकाणी संरक्षक कठड्याला तडे आहेत असे वाटते ते तडे नसून संबंधित पुलाची पाच भागात स्लॅबने जोडणी केली आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्याची पाच भागात विभागणी केलेली आहे. हे करत असताना साधरण दोन कठड्यामध्ये एक इंचाचे तांत्रिकदृष्ट्या अंतर ठेवले आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाचे संरक्षक कठडे धोकादायक नसून सुरक्षित आहे. असे ठाम मत जाणकारांनी मांडले आहे.

'संबंधित पुलाला तडा गेला असे संबोधले गेले असले, तरी प्रत्यक्षात मात्र तांत्रिकदृष्टया दोन सरंक्षक कठड्यांमधील सोडलेले एक इंचाचे अंतर आहे. याला सांधे जोड म्हणतात. उड्डाण पुलाचा स्लॅबचा भाग पूर्णपणे सुरक्षित आहे व पुलाला कुठल्याही प्रकारे धोका नाही. तरी जनहितासाठी अभियंते पाठवून सरंक्षक कठड्याच्या माजबुतीची खात्री करून घेऊ.
- श्रीनिवास बोनला, अभियंता - प्रकल्प विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News : धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे नजर कैदीत! निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त

पाकिस्तानी फलंदाजाचा डोकं चालेनासं झालं; U19 World Cup मध्ये विचित्र पद्धतीने झाला बाद, विकेटचा Video Viral

Kolhapur Polls : राजर्षी शाहू आघाडीला नडला जागांचा अट्टहास; एकही उमेदवार विजयी नाही, नव्याने मांडावी लागणार गणितं

ठाणे, नवी मुंबई, पनवेल ते वसई विरार; महामुंबईतील ८ महापालिकांमध्ये काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये- अमोल बालवडकर

SCROLL FOR NEXT