Kyrgyzstan sakal
पुणे

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

किर्गिझस्तानमध्ये आशियातील विशेषतः पाकिस्तानातील विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - किर्गिझस्तानमध्ये आशियातील विशेषतः पाकिस्तानातील विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यात भारतीय विद्यार्थीही असुरक्षित असून त्यांना परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक आणि राज्याच्या मंत्र्यांनी परराष्ट्र विभागाकडे केली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गिझस्तानमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांमध्ये आहे. त्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे आता तेलंगणनंतर महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोलीच्या जिल्हा प्रशासनाने किर्गिझस्तानमधील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

तेथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या राज्यातील ५०० विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ते म्हणतात, ‘‘किर्गिझस्तानच्या बिश्केक शहरात बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तेथील स्थानिकांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हल्ले केले आहेत. विद्यार्थी प्रचंड घाबरले असून परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.’’ तेथे तणावाखाली असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून होत आहे. लवकरच प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

किर्गिझस्तानातील बिश्केक शहरात मी ‘एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आमच्या वसतिगृहातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्रास देण्यात आला. यामुळे भारतीय विद्यार्थी चिंतेत असून दूतावासाने तातडीने आमची मदत करावी.’’

- अनिकेत बडे पाटील (‘एक्स’वर केलेली पोस्ट)

अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविली आहे. अजून पुण्यातून कोणत्याही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही. तशी माहिती आल्यास तातडीने परराष्ट्र मंत्रालयाकडे कळविली जाईल.’’

- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

4 वर्ष अमेरिकेत राहून मृणाल दुसानिस भारतात का परतली? म्हणाली...'भारतात येण्याचा निर्णय घेतला कारण...'

SCROLL FOR NEXT