pune  sakal
पुणे

मला जेलमध्ये माेबाईल अन् सीमकार्ड आणून दे'

येरवडा कारागृहातील आरोपीची बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसूल करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून दोन सॅमसंगचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर, अशा सूचना दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या प्रकरणी सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांनी अटक केली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. ती पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केली.

दरम्यान, राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला ॲड. विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. राणी आणि सागरची पत्नी जिग्नेशा राजपूत यांनी मिळून फिर्यादीला धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले आहे. तिच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत. पैसे मिळण्यासाठी ती साक्षीदारांच्या घरी जाऊन राहत आहे. सागर याने सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून त्यांच्या साथीदारांना पैसे कसे वसूल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तिची जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. मुरळीकर यांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शब्द पाळणार, कसलाही अडथळा आला तरी दूर करू; विशेष अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

Sushilkumar Shinde : सुशिलकुमार शिंदेचे डिलिमिटेशनला समर्थन?; त्यामुळे डिलिमिटेशन होणे गरजेचे, काय म्हणाल शिंदे

Afghanistan ban women names: अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या नावांवरच बंदी! कागदपत्रांमध्ये गाय, बकरी किंवा बीबी; लिहिण्याचा फतवा

Marathi News Live Updates : सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपकडून डिलिमिटेशन बील- खर्गेंचा आरोप

Sanjay Raut : अमोल कोल्हेंनी निवडूण यावं; संजय राऊतांचा थेट इशारा, डिलिमिटेशन विधेयकावरून महाविकास आघाडीत मतभेद

SCROLL FOR NEXT