चास, ता.५ : पारंपरिक शेतीला फाटा देत मिरजेवाडीमधील (ता. खेड) शेतकरी शिवाजी धोंडिबा घनवट यांनी २५ गुंठ्यांत ब्रोकोलीची लागवड केली. ही भाजी आता फुलली असून त्यामधून साडेचार ते पाच टनापर्यंत उत्पादन मिळणार आहे. सद्यःस्थितीत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे. तो टिकून राहिल्यास चार लाखांचे उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांना आहे. बाजारभावाचा वेध घेत नवीन प्रयोग यशस्वी करण्याची किमया घनवट यांनी साधली आहे.
बटाटा व कांदा पिकाला लागणारे मणुष्यबळ, खते, औषधे व एवढे करूनही अपेक्षीत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो आहे. जी स्थिती कांदा व बटाटा पिकाची तीच स्थिती धना, मेथी, कोबी, फ्लॉवर पिकाची. यामुळे त्रासलेला शेतकरी आता अन्य पर्याय निवडताना दिसतो आहे. घनवट यांनी सध्याच्या बाजारभावाचा अभ्यास करून डिसेंबर महिन्यात ब्रोकोलीची लागवड करण्याचा निर्णय घेतला व जमिनीची मशागत करून शेणखत टाकले. बेड तयार केल्यावर त्यावर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. मल्चिंग पेपरच्या साह्याने बेडवर आच्छादन केल्यावर ब्रोकोलीच्या सहा हजार रोपांची लागवड केली. थंड वातावरण व पिकाला पोषक वातावरण यामुळे पीक जोमदार आले. प्रामुख्याने पंचताराकिंत हॅाटेल व मॅालमध्ये या पिकाला जास्त मागणी असल्याने बाजारभावाबरोबरच घनवट यांनी विक्रीची व्यवस्था पाहिली.
ब्रोकोली पिकापासून चांगले उत्पन्न मिळणार आहे. सरासरी साडेचार ते पाच टनापर्यंत उत्पादन अपेक्षीत आहे. सद्य स्थितीत बाजारभाव पाहता खर्च वजा जाता आम्हाला साडे तीन ते चार लाखापर्यंत उत्पन्न मिळणार आहे. लागवडीपासून पीक ५० दिवसांत तयार झाले. यापुढेही अधिक उत्पादन मिळणार आहे.
- शिवाजी घनवट, शेतकरी
04360
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.