पुणे

धक्कादायक : जुन्नर तालुक्यात भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

सकाळवृत्तसेवा

आपटाळे : जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने सख्या चुलत भावाने भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडत नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना (सोमवार ता. 2 रोजी) जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चुलतभवाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश नामदेव मनसुख (वय 58) असं मृत भावाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकनाथवाडी, सावरगाव (ता. जुन्नर) येथे जमिनीच्या वादातून तसेच ट्रॅकटरच्या भाड्याच्या वादातून जयनाथ सोपान मनसुख याने चुलत भाऊ प्रकाश मनसुख यांच्या अंगावर सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

गावातील मुख्य चौकात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रकाश मनसुख यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे हलविण्यात आले होते. माञ मंगळवार (ता. 3 रोजी) रात्री 12.30 वाजेच्या सुमारास प्रकाश मनसुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या गुन्ह्यातील आरोपी चुलतभाऊ जयनाथ सोपान मनसुख यास अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आला आहे. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते, साहय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जमिनीचा वाद तसेच ट्रॅकटर च्या भाड्याच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता 6 नोव्हेंबर पर्यंत आरोपीस पोलीस कोठडी मिळाली आहे. -अनिल लंभाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड (जुन्नर चार्ज)

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT