crime 
पुणे

पिंपरीत खून लपवण्यासाठी केला अपघाताचा बनाव 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : प्रॉपर्टीचे पैसे मागते म्हणून बहिणीचा डोके आपटून तिचा खून केला. हा खून लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या बहिणीला रुग्णालयात नेत असताना मोटारीला आग लागून त्यात तिचा मृत्यू झाल्याचा देखावा भावाने निर्माण केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा बनाव आठ महिन्याने उघडकीस आला. याप्रकरणी खूनी भावावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संगीता मनीष हिवाळे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता हिवाळे यांचे पतीशी मतभेद असल्याने त्या आपल्या भावाच्या जवळ मुलांसह राहात होत्या. ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी जॉन यांचे आपली बहीण संगीता हिच्याशी पैशावरून वाद झाले. यावेळी जॉन यांनी संगीताचे डोके जोरात फरशीवर आपटले. या घटनेत संगीता यांचा मृत्यू झाला, खुनाचा हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि बहिणीच्या विम्याचे ३० लाख रूपये मिळावेत म्हणून जॉन याने आपली आई व संगीता यांचा मुलगा यांना बोलावून संगीता ही हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.

मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ, असे सांगत संगीता त्यांचा मुलगा व आई यांना जॉन याने एमएच-१४-ईएम-३७०९ या मोटारीत बसवले. सयाजी हॉटेलच्या पुढे मुंबई बेंगलोर महामार्गावर निर्मनुष्य ठिकाणी गाडीमध्ये बिघाड झाल्याचा बहाणा जॉन याने केला. संगीता यांच्या मुलास बोनेट उघडून समोर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी जॉन यांची आई लघुशंकेसाठी करता गेली होती. ही संधी साधत आरोपी जॉन याने बहिणीच्या अंगावर तसेच मोटारीमध्ये पेट्रोल टाकून लायटरने मोटार पेटवून दिली. शॉर्ट सर्किटमुळे मोटार पेटून त्यात बहिणीचा मृत्यू झाल्याचे आरोपी जॉन याने सर्वांना भासविले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी जॉन याने खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी जॉन याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poland Crisis: पोलंडमध्ये सत्तापालटाच्या हालचाली? अध्यक्षांवर दौरा अर्धवट टाकून विमान माघारी वळविण्याची वेळ का आली?

Mumbai Local: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ घाटाला भेट

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये टेक्निकल आणि ड्रायव्हर पदांची भरती; दहावी पास अन् ITI धारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील रास्ता रोकोआधी शेतकरी नेते स्थानबद्ध; नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT