crime
crime 
पुणे

पुण्यात कॅम्प परिसरात 'सैराट'ची पुनरावृत्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे : प्रेम प्रकरणातून भावानेच आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरातील मारझोरियन बेकरी जवळ घडला आहे. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुल्तान मैनु सय्यद (रा.लुल्लानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अरबाज कुरैशी असे संशयित आरोपीचे नाव आहे. सुल्तानला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सुल्तान सय्यद हा नारळ विक्रीचा व्यावसाय करतो. त्याचे आणि आरोपी अरबाजच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेम विवाह देखील केला होता. मात्र हा विवाह अरबाजच्या घरच्यांना मान्य नव्हता. यातून अनेकदा त्यांच्यात वाद देखील झाले होते. मात्र आज अरबाजने रागाच्या भरात साडेआठ वाजता सय्यदवर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबत रात्री उशीरापर्यंत लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT