Attack sakal
पुणे

Pune Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने सख्ख्या भावाकडूनच हत्याराने वार

आईला आणि पत्नीला शिवीगाळ का केली, याचा जाब विचारल्यामुळे एकाने सख्ख्या भावावरच हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उंड्री येथील कडनगरमध्ये घडली.‌

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आईला आणि पत्नीला शिवीगाळ का केली, याचा जाब विचारल्यामुळे एकाने सख्ख्या भावावरच हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उंड्री येथील कडनगरमध्ये घडली.‌

मयूर प्रकाश कड (वय ३३, रा. होले वस्ती, कडनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश प्रकाश कड याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर कड हे त्याच्या मित्रासोबत पाच जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास होले वस्तीत घराजवळ गप्पा मारत उभे होते. त्यावेळी मयूर यांनी त्यांचा भाऊ गणेश कड याला 'तू आई आणि पत्नीला शिवीगाळ का केली', याबाबत जाब विचारला.

त्याचा राग आल्याने गणेशने मयूर याच्यावर हत्याराने वार केला. त्यात मयूर याच्या हाताची दोन बोटे तुटली. तसेच, त्याच्या मानेवर वार केला. त्यात मयूर कड हा जखमी झाला. आरोपी गणेश कड याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT