पुणे

आठ दिवसांत दोन सख्खे भाऊ काळाच्या पडद्याआड. (पटवर्धन कुरोली येथील मगर कुटुंबातील घटना)

CD

PTK25B01015
सर्जेराव मगर व रामदास मगर
---
सख्खे भाऊ ८ दिवसांत
काळाच्या पडद्याआड
प. कुरोलीतील मगर कुटुंबातील घटना
सकाळ वृत्तसेवा
पटवर्धन कुरोली, ता. १ : एकाच घरात वाढलेले, आयुष्यभर शेतीच्या मळ्यात खांद्याला खांदा लावून कष्ट करणारे आणि सुख- दुःखात कधीही वेगळे न झालेले दोन सख्खे भाऊ अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले. ही घटना पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोलीत घडली. एका मागोमाग एक कर्ते पुरुष हरपल्याने मगर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुहेरी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
येथील सर्जेराव मगर आणि रामदास मगर हे दोघे भाऊ पारंपरिक शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. पूर्वापार शेती हा परिवाराचा व्यवसाय असून, दोघेही सधन शेतकरी म्हणून ओळखले जात होते. थोरले सर्जेराव यांना दोन मुले व एक विवाहित मुलगी असून, त्यांचा थोरला मुलगा श्रीकांत पोलिस खात्यात कार्यरत आहे, तर धाकटा विक्रम शेती पाहतो. धाकटे रामदास यांना दोन मुले असून, गणेश हा फोटो शॉपी व्यवसायात कार्यरत आहे, तर सौरभ शेती करतो.
रामदास मगर यांना मंगळवारी (२३ डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे अचानक निधन झाले. या दुःखातून सावरत असतानाच थोरले भाऊ सर्जेराव यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (३० डिसेंबर) उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. धाकट्या भावाचे उत्तरकार्य होण्याअगोदरच थोरल्या भावाचे निधन झाल्याने मगर परिवारावर दुहेरी आघात झाला आहे. मेहनत, साधेपणा आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे दोघेही भाऊ गावात आदराने ओळखले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT