स्वारगेट - स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर दुभाजक तोडून नव्या लेनचे रुंदीकरण करण्यात येत आहे. (दुसऱ्या छायाचित्रात) बीआरटी मार्गावर मधेच लेनची मोडतोड झाल्याने दुचाकीस्वार बीआरटी लेनमध्ये धोकादायकपणे येतात.
स्वारगेट - स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर दुभाजक तोडून नव्या लेनचे रुंदीकरण करण्यात येत आहे. (दुसऱ्या छायाचित्रात) बीआरटी मार्गावर मधेच लेनची मोडतोड झाल्याने दुचाकीस्वार बीआरटी लेनमध्ये धोकादायकपणे येतात. 
पुणे

#PuneBRT का होत आहे बीआरटीची मोडतोड?

महेश जगताप

स्वारगेट - हडपसर-कात्रज मार्गावर बीआरटीच्या नावाखाली महापालिका तब्बल १५ वर्षे काम करीत असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयेही खर्च करीत आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या फसलेल्या नियोजनाचे हे एक ठळक उदाहरण असून, नागरिकांचा पैसाही वाया जात आहे. मात्र, बीआरटी सुरू केव्हा होणार, याबद्दल महापालिका ठामपणे काहीच सांगू शकत नाही. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज म्हणून सर्वपक्षीय एकमत झाल्यावर हा प्रकल्प सुरू झाला. मात्र सुरुवातीपासूनच बीआरटी म्हणजे काय, त्यात कोणत्या सुविधा हव्यात, याबाबतचे पुरेसे नियोजन न करता अंमलबजावणीला सुरवात केल्यामुळे बीआरटीची फरफट झाली अन्‌ ती अजूनही सुरूच आहे. देशातील पहिला पायलट प्रोजेक्‍ट म्हणून कात्रज-हडपसर रस्त्यावर २००६ मध्ये या कामाला सुरुवात झाली. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्यामुळे टप्प्याटप्याने बीआरटी बंद पडली. मात्र त्यानंतर पुन्हा तीन वर्षांपूर्वी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून सातारा रस्त्यावर बीआरटी मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र दोन वर्षांत होणारे काम तीन वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. खर्चाचे आकडे मात्र वाढत आहे. तर हडपसर रस्त्यावर महापालिका पुन्हा काम करणार आहे. बीआरटी मार्गातून प्रवाशांची वाहतूक मोठ्या संख्येने आणि वेगाने होते, हे जगातील अनेक शहरांत स्पष्ट झाले आहे. पुणे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

बीआरटीमध्ये अपेक्षित
    बीआरटी मार्गात दुतर्फा प्रवासासाठी एकच बसथांबा
    ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त ठरणारे लेव्हल बोर्डिंग 
    वेळापत्रकाची अचूक माहिती 
    बीआरटीसाठी स्वतंत्र सिग्नल व्यवस्था 
    अत्याधुनिक बस उपलब्ध करून देणे
    तिकिटासाठी स्मार्टफोन ॲप विकसित करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT