पुणे

बीआरटी मेट्रोला पूरक हवी - ओजस कुलकर्णी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘आकुर्डी चौक ते प्राधिकरण वळणादरम्यानच्या १.४ किलोमीटरच्या अंतरावर सहा वेळा वेग कमी करावा (स्लोडाउन) लागतो. त्यामुळे ती वेगवान सेवा कशी होईल, याचा विचार करायला हवा. येत्या काही काळात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर बीआरटीने कोण प्रवास करेल? त्यामुळे बीआरटी सेवा ही मेट्रोला पूरक ठरणारी असायला हवी,’’ असे प्रतिपादन पुणे अर्बन लॅब ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे वास्तुरचनाकार ओजस कुलकर्णी यांनी निगडी येथे केले.

पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमच्या (पीसीसीएफ) वतीने निगडी ते दापोडीदरम्यानच्या पीएमपीच्या बीआरटी सेवेबद्दल ‘तुम्हाला हे माहीत आहे का’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी कुलकर्णी बोलत होते. या वेळी नोव्हेल हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संस्थापक अमित गोरखे, ग्राहक पंचायतीचे शहरप्रमुख रमेश सरदेसाई, रोटरी क्‍लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, तनपुरे फाउंडेशन, जुगल राठी आदींसह काही प्रवासीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘बगोटा, चीन या देशांसह गुजरातमधील अहमदाबाद येथे बीआरटीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे. निगडी ते दापोडीदरम्यानच्या बीआरटी मार्गावर प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर येताना-जाताना नीट न पाहिल्यास वाहनचालकांना अपघाताचा धोका आहे. निगडी ते दापोडी बीआरटी बससेवेच्या एकूण १२ किलोमीटर मार्गात केवळ ५५ टक्के मार्ग हा निव्वळ बीआरटीचा मार्ग आहे.’’  पीसीसीएफचे अमोल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

बीआरटीची स्थिती
 पादचाऱ्यांसाठी सहज सोयीची नाही
 जिने करताना ज्येष्ठ नागरिक, अपंगांचा विचार केला नाही
 प्रवेशमार्गावर स्वयंचलित बूम बॅरिअरची गरज
 बस बंद पडल्यास पर्यायी सक्षम व्यवस्थेचा अभाव
 पायाभूत सुविधांचा खराब दर्जा
 मार्गाच्या सुरक्षेविषयी लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) गरजेचे

रोज निगडी ते घोरपडी प्रवास करते. हडपसरची बस कधीही वेळेवर येत नाही. सकाळी ६.५०, ७ ची बस अनेकदा येत नाही. त्यानंतर थेट ७.५० वाजता बस येते. या बसमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे बहुतेक रोजच कामावर जाण्यास उशीर होतो. पगारही कापला गेल्याने आर्थिक नुकसानही होते. 
- अलका कांबळे, प्रवासी, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT