Brutal murder of a minor girl by throwing a stone at her head at Theur 
पुणे

थेऊर येथे अल्पवयीन मुलीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

मृतदेह थेऊर पोलीस चौकीच्या समोरील मोकळ्या जागेत टाकून दिला

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) - थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत १६ ते १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून मृतदेह टाकल्याचे आढळून आले आहे. चिंतामणी हायस्कूलच्या समोरील कारखान्याच्या मोकळ्या जागेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज मंगळवारी (ता५) पहाटे काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहिल्यानंतर नागरिकांनी तातडीने ही बाब लोणी काळभोर पोलिसांना कळविली.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉड पथकही दाखल झाले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

‘माधुरीसोबत रोमाँन्स करताना मला...' इंटिमेंट सीनबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले...'तिच्या डोळ्यात पाहिलं की...

Jalgaon Municipal Corporation जळगावकरांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे! ३०० फुटांच्या घरांची घरपट्टी यंदा तरी माफ होणार का?

livestock farmers: पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! खेळत्या भांडवलावरील व्याजात ४% सवलत; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT