पुणे

घोरपडीत सहा दुकाने फोडली

CD

घोरपडी, ता. १ : बी. टी. कवडे रस्ता परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत सहा दुकानांमध्ये फ्रिज व इतर वस्तूंची तोडफोड केली. रस्त्यावरील काही वाहनांवर कोयता मारल्याने वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता. ३१) रात्री ही घटना घडली. यामध्ये चेहऱ्यावर मास्क लावलेले चार पुरुष व एक महिला होती. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गेल्या दोन वर्षांत याच भागात अनेकदा अशाच प्रकारच्या कोयत्याने हल्ले व तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर सौम्य कारवाई होते. यावेळी या घटनेमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कोयता गॅंगमध्ये महिलाही सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. कॅमेरे सुरू असते तर आरोपींना ओळखणे सोपे झाले असते. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्यापाऱ्यांनी परिसरात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची तसेच रात्री गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. वारंवार अशा घटना घडत असताना कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी बी. टी. कवडे रस्ता व्यापारी संघटनेचे सचिव रिझवान खान यांनी केली आहे.

बी. टी. कवडे रस्ता येथे घडलेल्या घटनेमध्ये चार ते पाच दुकानांची तोडफोड झाली आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन जणांचा तपास सुरू आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल.
- राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त, झोन ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT