बौद्ध लेण्यांचा परिसर झाला चकाचक
चचेगावकडील भागात स्वच्छता मोहीम; ‘बुद्ध लेणी’ संवर्धनाची कार्यशाळा
मलकापूर, ता. २ : आगाशिव डोंगरावरील चचेगाव टाकेवस्ती येथील बौद्ध लेण्यांचा परिसर चकाचक झाला. कऱ्हाड येथील बौद्ध युवा जागृती परिषदेच्या वतीने एक दिवसीय ‘बुद्ध लेणी’ संवर्धनासाठी आगाशिव लेण्या परिसरात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेनंतर लेणी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सातवाहनकालीन व्यापारी मार्गावर असलेल्या प्राचीन वारसा स्थळांच्या यादीत आगाशिवनगरच्या डोंगरात असलेल्या जखिणवाडी बुद्ध लेणी, आगाशिव बुद्ध लेणी व चचेगाव टाकेवस्ती बुद्ध लेणी समूह समाविष्ट आहेत. चचेगाव टाकेवस्ती बुद्ध लेणीवर आठ लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. त्यात एक गजपुष्टाकार आकाराचे चैत्यगृह, चैत्यस्तूप, पिंपळपानाच्या आकाराची असलेली कमान, मुख्य प्रवेशद्वारावर खडकात कोरलेले कोरीव उठावदार अर्धचैत्य स्तूप व पिंपळपाना कृती शिल्पमाला, चैत्यविहार ध्यान कक्ष, शून्यागार, बसण्यासाठीचे बाक व पाण्याची पोडी पाहायला मिळतात. हा परिसर झाडाझुडपांनी व गाळ, कचऱ्याने भरून गेला आहे. चैत्यगृह व चैत्यविहारात गाळ साचला आहे. ऊन, वारा, पाऊस, भूकंपामुळे लेण्यांना तडे जाऊन, जीर्ण होऊन लेण्या नष्ट होण्याच्या मार्गावर असताना युवकांच्या या कार्याने संवर्धनासाठी आशावाद निर्माण झाला आहे. यासाठी जिल्ह्यातील युवा बौद्ध जागृती परिषदेच्या वतीने विविध बुद्ध लेण्यांवर संवर्धन कार्य केले जाते. सर्व भारतीयांनी लेणी संवर्धन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी केले.
या वेळी बौद्ध युवा जागृती परिषदेचे कैलास कांबळे, सह्याद्री बुद्ध लेणी संवर्धक समूहाचे रोहित वाघमारे, कोल्हापूरमधील मुक्त लेणी संवर्धक विजय कांबळे, तानाजी कांबळे, बौद्ध युवा जागृती परिषदचे श्रीधर गोखले, स्वप्नील जाधव, विनोद कांबळे, संजय कांबळे, शशिकांत दुपटे, आकाश एटंबे, अमोल वाघमारे, अनुज माने, रोहन कोळपे, आर्यन काटरे, आर्यन दरागडे, प्रथमेश माने उपस्थित होते.
.......
A01262
मलकापूर : आगाशिव डोंगरावरील बौद्ध लेण्यांची स्वच्छता मोहीम करताना बौद्ध युवा जागृती परिषदेचे पदाधिकारी.
...............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.