Pune Crime News esakal
पुणे

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Builder Crime News: बिल्डर रहिवाशांना मारहाण करण्याच्या पूर्ण तयारीत आला होता. त्याच्या गाडीमध्ये बेसबॉल स्टिक, बॅट इत्यादी साहित्य देखील होते.

कार्तिक पुजारी

Pune Crime News: पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूस हद्दीत एका बिल्डरने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. बिल्डर रहिवाशांना मारहाण करण्याच्या पूर्ण तयारीत आला होता.

त्याच्या गाडीमध्ये बेसबॉल स्टिक, बॅट इत्यादी साहित्य देखील होते. सूस हद्दीतील किर्लोस्कर कंपनीच्या मागे असलेल्या तिर्थ टॉवरमधील रहिवाशांना मारहाण झाल्याची माहिती आहे. तिर्थ टॉवरचे रहिवाशी सोमनाथ गुंड यांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

बिल्डर आणि सोसायटीमधील रहिवाशी यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता हे समजू शकलेलं नाही. पण, बिल्डरची गुंडगिरी यातून दिसून आली आहे. बिल्डर अत्यंत घाणेरड्या भाषेत रहिवाशांनी बोलतो. तसेच तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ते करा, अशी धमकी देखील तो देत आहे.

सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर यासंदर्भात अनेकांनी पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर..एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो.

ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती, असं ते म्हणाले आहेत.

तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकाराने पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील, पुणे पोलिसांना देखील टॅग केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING : शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?

Pune News: बदल्यांमुळे प्राध्यापकांचा उत्सव पगाराविना; पुणे जिल्ह्यासह राज्यातील स्थिती, सुमारे १६० जणांचे पगार रखडले

Maratha Reservation Celebration: 'मराठा आरक्षण मिळाल्याचा राशीनमध्ये आनंदोत्सव'; सकल मराठा समाजातर्फे घोषणाबाजी, पेढे वाटप

Bihar Band: पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अपशब्द; एनडीएकडून आज बिहार बंदची हाक, तेजस्वी यादव म्हणाले- भाजपचे नेते जेव्हा...

Explained: अचानक डोके दुखी का वाढते? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

SCROLL FOR NEXT