Fraud sakal
पुणे

बावधनला बिल्डरांकडून पीएमआरडीए, जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक; गुन्हा दाखल

न्यायालयाच्या दणक्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वास्तूविशारदासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बंडू दातीर

बावधन : अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतल्या प्रकरणी बावधन येथील तीन बांधकाम व्यावसायिकांनी पीएमआरडीए आणि जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वास्तूविशारदासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजेंद्र बाळानाथ भुंडे (रा.बावधन) यांनी फिर्याद दिली असून मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार, सचिन पोपटलाल नहार आणि वास्तूविशारद सिमा गोहाड अशी या गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत.

भुंडे यांनी बावधन येथील आपली जागा येवले, शेंडे आणि नहार यांच्या एएसआर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मला पेब्बल अर्बनिया या गृहप्रकल्पासाठी काही जागा दिली होती. प्रकल्पाच्या जवळच भुंडे यांचीही आणखी पाच गुंठे जागा होती. ही जागा दिलेली नसतानाही येवले यांनी या जागेतून बेकायदा रस्ता बनविला. याबाबत भुंडे यांनी वेळोवेळी हिंजवडी पोलिसांकडे दाद मागितली. परंतू त्यांनी दूर्लक्ष केले. उलट फेब्रुवारीत बिल्डरांनी सदनिकाधारकाकरवी भुंडेच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेवून त्यांना अटक केली होती.

त्यामुळे भुंडे बंधूंनी न्यायालयाकडे दाद मागितली.त्यांनी पीएमआरडीए, जिल्हाधिकरी कार्यालयातून याबाबत माहिती घेतली. अस्तित्वातच नसलेला बारा मीटरचा रस्ता दाखवून येवले यांनी बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला होता. आजही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी घरे आहेत त्या जागी रस्ता असल्याचे दर्शवून येवले यांनी पीएमआरडी कडून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला. शाम शेंडे यांनी शासकीय कागदपत्रात काही ठिकाणी स्वःताच्या नावाचा शाम वाणी असा उल्लेख केला. भुंडे यांना दिलेले पार्किंग येवले यांनी परस्पर इतरांना विकले. बिल्डरांनी पीएमआरडीए आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही फसवणूक केली.या सर्व बाबी भुंडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

त्यासाठी भुंडे यांनी गुगल नकाशे आणि छायाचित्रे सादर केली. भुंडे यांच्याकडून अॅड सिद्धेश्वर चौधरी, अॅड पृथ्वीराज फाळके, अॅड सिद्धार्थ शिंदे, अॅड माधुरी लाटे यांनी काम पाहिले. तथापि न्यायालयाच्या आदेशानंतर हिंजवडी पोलिसांनी पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीएमआरडीएनेही या बिल्डरांवर कारवाई करावी अशी मागणी भुंडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली T20I मालिका; झिम्बाब्वेचा दुसर्‍या सामन्यात उडवला धुव्वा

संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी! शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

विषय चांगला पण.. कसा आहे श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालचा 'द इंडिया स्टोरी'? वाचा रिव्ह्यू

Sharad Pawar on NEET Protest : नीट आंदोलनाच्या तोडग्यासाठी माझा सल्ला महत्त्वाचा ठरला, असा शरद पवारांचा दावा

Pune Student Protest Celebration : शिक्षणमंत्र्यांच्या कथित राजीनाम्याच्या दाव्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘मेलोडी’ वाटून साजरा केला आनंदोत्सव

SCROLL FOR NEXT