पुणे

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्‍या पदाधिकारी निवडी संपन्न

CD

बिल्डर्स असोसिएशनच्या
अध्यक्षपदी कौस्तुभ मोरे

सातारा शाखेसाठी निवडी; सचिवपदी नीलेश शिंदे

सातारा, ता. २८ : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा शाखेच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच झाल्या. २०२६-२७ या वर्षांसाठी अध्यक्षपदी कौस्तुभ मोरे, सचिवपदी नीलेश शिंदे, उपाध्यक्षपदी हर्षद वालावलकर, ट्रेझररपदी शरद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर संतोष जगताप व रामदास जगताप यांची जनरल कौन्सिल मेंबरपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी सदस्यांच्या निवडी लवकरच जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले. यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होईल.
१९४१ पासून कार्यरत असलेली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था देशभरात बांधकाम व्यावसायिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा देशपातळीवरील संस्थेमधील बीएआय, सातारा सेंटरचा उत्कृष्ट ॲक्टिव्ह सेंटर म्हणून नावलौकिक आहे. सातारा सेंटरतर्फे दर वर्षी बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुद्धा काही समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात. सातारा सेंटरच्या नावलौकिकाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा मनोदय श्री. मोरे यांनी व्यक्त केला.

-----------------------

25962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT