Construction 
पुणे

दुरुस्तीच्या नावाखाली भुसार बाजारात बांधकाम

सकाळवृत्तसेवा

पुणे - मार्केटयार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किराणा भुसार मालाच्या बाजारात दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण बांधकाम करण्याचे प्रकार सुरूच आहेत. 

किराणा भुसार मालाच्या बाजारातील गाळ्यांचे बांधकाम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. साइड पट्ट्यांमधील बांधकामे, दुकानापुढील ओटे असे मुद्दे वादग्रस्त ठरले आहेत. गोदामाची जागा अपुरी पडत असल्याने साइड मार्जिनमध्ये बांधकाम करून जागा उपलब्ध करून घेतली आहे. हे बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी यापूर्वी प्रयत्न केले आहे. अद्याप हा विषय मार्गी लागलेला नाही. आता गेल्या तीन- चार वर्षांत दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण बांधकाम करण्याचे प्रकार वाढले आहेत. बाजार समिती संबंधित गाळेधारकांना केवळ बांधकाम दुरुस्तीची परवानगी देते. आधीचे बांधकाम पाडून, त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करावयाचे असल्यास पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. दुरुस्तीसाठी बाजार समितीकडे अर्ज केल्यानंतर पूर्ण बांधकाम केले जात आहे. किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अतिरिक्त बांधकाम केले जात असल्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, ‘‘संबंधित बांधकामाची पाहणी केली जाईल. परवानगी आहे की नाही याची पडताळणी करून कार्यवाही केली जाईल.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji New Water Supply Scheme : इचलकरंजी शहरासाठी आता नवी पाणी योजना; राहुल आवाडेंनी सांगितला प्लॅन, मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीच्या सूचना

१५ लाखात तलाठी! लॅपटॉप अन् प्रशिक्षण पत्र देऊन फोटो काढले; बनावट आदेश काढत बेरोजगारांची फसवणूक

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

SCROLL FOR NEXT