Vehicle Burnt sakal
पुणे

नऱ्हे येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये सहा वाहने जळून खाक

नऱ्हे येथे मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग लागली. आगीमधे ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

विठ्ठल तांबे

नऱ्हे येथे मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग लागली. आगीमधे ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

धायरी - नऱ्हे येथे मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग लागली. आगीमधे ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगच्या वरील सिलिंगच्या काही भागाला आगीची झळ लागली. अग्निशमन दालने वेळेत येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इमारतीत कुठल्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझविण्यासाठी उशीर झाला. तत्पूर्वी, दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली व फवाऱ्याच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

ही इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेशी संबंधित दोन संशयीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसी टीव्ही नसल्याने पोलिसांना तपास करण्यात अडथळा येत आहे.

आगीची माहिती समजताच सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम,पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर,संजय शिंदे ,शंकर कुंभार, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवा क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे आल्यानंतर नवले अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनास्थळावर पोहोचताच पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पूर्णपणे विझवत धोका दूर केला. या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, वाहनचालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे ,मदतनीस द. नलवडे, प्र.नलवडे, वि. मच्छिंद्र यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT