पुणे

बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांची पैसेवारी ५० पैशांखाली खरीप हंगामाची नजर अंदाज पिकेवारी जाहीर; सरासरी पैसेवारी ४३ पैसे

CD

बुलडाणा जिल्ह्यात
पैसेवारी ५० पैशांखाली

खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची नजर अंदाज पिकेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली असून, जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४३ पैसे आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार जळगाव जामोद तालुक्याची सरासरी पैसेवारी सर्वाधिक, तर बुलडाणा तालुक्याची सर्वांत कमी आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुलडाणा तालुक्यातील ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद ११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा नजर अंदाजामध्ये समावेश आहे.
तालुकानिहाय सरासरी पैसेवारीचा विचार करता, जळगाव जामोद तालुक्याची पैसेवारी ४८ पैसे असून, ती जिल्ह्यात सर्वाधिक आहे. मेहकरची ४५, लोणार ४६, मलकापूर ४६, मोताळा ४६, शेगाव ४६ आणि संग्रामपूरची ४६ पैसेवारी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय चिखली तालुक्याची सरासरी पैसेवारी ३८, देऊळगाव राजा ४३, सिंदखेड राजा ४३, नांदुरा ४३ आणि खामगाव ४२ पैसे आहे. बुलडाणा तालुक्याची सरासरी पैसेवारी ३१ पैसे असून, ती जिल्ह्यात सर्वात कमी आहे.
जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थितीचा प्राथमिक अंदाज या नजर अंदाज पैसेवारीतून समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी खरीप पिकांच्या सद्यःस्थितीचा प्राथमिक अंदाज म्हणून पाहिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT