पुणे

मोठ्या कचरा उत्पादकांचे महापालिकेकडून सर्वेक्षण

CD

पिंपरी, ता. ८ : शहरात दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, मंगल कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांचे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘बल्क वेस्ट जनरेटर’ म्हणून संबंधित आस्थापनांची नोंदणी करून कचऱ्याचे वर्गीकरण आणि जागेवरच प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
मोशी कचरा डेपोवरील वाढता ताण आणि शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेने विकेंद्रित कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी दहा ठिकाणे निश्चित केली आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिकांचा विरोध असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याची प्रक्रिया करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
महापालिकेची पथके सोसायट्या आणि विविध आस्थापनांना भेटी देऊन कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी तसेच विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, असे वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच अन्य शास्त्रोक्त प्रक्रियेची माहितीही दिली जात आहे. दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रत्यक्ष माहिती संकलित केली जाणार आहे.

‘‘कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे. मोठ्या कचरा उत्पादकांनी कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि नोंदणीला प्राधान्य द्यावे. सर्वेक्षण आणि नोंदणीसाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्तीही केली जाणार आहे.’’
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT