bull running sakal
पुणे

Bull : लक्ष्याची कमाल अन् बैलमालकाची धमाल! बैलाची तब्बल तीस लाखाला विक्री

लक्ष्याची कमाल अन् बैलमालकाची धमाल बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या बैलाची तब्बल तीस लाखाला विक्री

सुदाम बिडकर

पारगाव - जारकरवाडी ता.आंबेगाव येथील माऊलीकृपा बैलगाडा संघटनेच्या पोपट सोनबा बढेकर व सुरेश सोनबा बढेकर या भावांचा बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या तसेच अनेक शर्यतीच्या घाटात “ घाटाचा राजा किताब मिळवणाऱ्या लक्ष्या नावाच्या खिल्लार जातीच्या बैलाची तब्बल ३० लाख ११ हजार १११ रुपयाला विक्री झाली आहे.

बैलगाडा शर्यती हा विषय ग्रामीण भागातील गाडा- बैलमालक व हौशी शेतकरी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रा- जत्रा उत्सव सुरू झाल्याने बैलगाडा शर्यतीस ठिकठिकाणी प्रारंभ झाला.

असून बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण व धुराळा उडताना दिसत आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत, त्यामुळे बैलगाडामालक शौकीन सुखावले आहेत. बैलगाडा शर्यतीच्या निगडीत अनेक व्यवसायाला चांगले दिवस आले आहे. बैलांच्याही किमती रोज नव नवा उच्चांक गाठत आहे.

बैलगाडा शर्यतीची आवड असणाऱ्या पोपट सोनबा बढेकर व सुरेश सोनबा बढेकर या भावांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय शर्यतीमुळे त्यांनी एक वर्षापूर्वी बैलाच्या व्यापाऱ्याकडून त्यांनी ४८ हजाराला एक बैल खरेदी केला.

त्याचे लक्ष्या म्हणून नाव ठेवले लक्ष्या बैलाने पुणे जिल्ह्यातील अनेक घाटामध्ये विजेतेपद मिळवून बक्षिसे व नावलौकीक मिळवला आहे.

लक्ष्याने लागोपाठ चार बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा किताब मिळवला नुकत्याच नांदूर (ता. आंबेगाव ) येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत सेमी फायनल मध्ये लक्ष्याने घाटाचा राजा किताब मिळवुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

त्यानंतर अनेक बैलगाडा मालकांनी बढेकर भावांकडे बैलाची मागणी केली गावडेवाडी ( ता.आंबेगाव) येथील कैलास भगवंता गावडे या हौशी बैलगाडा मालकाने ३० लाख ११ हजार १११ रुपये विक्रमी किमत देऊन लक्ष्या ची खरेदी केली आहे. या विक्रमी किमतीची तालुक्यात जोरात चर्चा सुरू आहे.

हौसेला मोल नसते असे म्हणतात या म्हणीचा अनुभव 'लक्ष्या ' बैल खरेदीच्या निमित्ताने आला असल्याचे बैलगाडा मालक सांगत आहे

माऊलीकृपा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शाम बढेकर म्हणाले कि पोपट बढेकर व सुरेश बढेकर या भावांनाही शर्यतीची खुप आवड आहे परंतु बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बैलाला चांगली किमत आल्याने त्यांनी लक्ष्याची विक्री केली.

या मिळालेल्या पैशातून ते कुटुंबावर असलेली काही देणी मिटवून चांगले घर बांधणार आहे. नवीन घराला “ लक्ष्या ” चे नाव देणार आहे लक्ष्या ला गावडे कुटुंबाकडे देण्यापूर्वी संपूर्ण बढेकरमळ्याने लक्ष्याची दत्त मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली लक्ष्याला निरोप देताना बढेकर कुटुंबाचे डोळे पाणावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT