पुणे

चालकाशिवाय सुसाट धावली बुलेट: पुणे-नाशिक महामार्गावरचा थरार

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटची पादचाऱ्याला धडक बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर बुलेटस्वार खाली पडला मात्र बुलेट महामार्गावरून सुमारे तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. यामुळे महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार पहिला मिळाला. ही घटना ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत माहिती अशी, नारायणगाव येथील भंगार व्यावसायिक तलवार ( पुर्ण नाव माहित नाही) सोमवारी सायंकाळी येथील पुणे-नाशिक महामार्गावरून बुलेटवर भरधाव वेगाने जात असताना पादचारी जनार्धन दत्तू गांजवे(वय ४७, गांजवेवाडी, ता. जुन्नर) यांना बुलेटची धडक बसली. यावेळी चालक तलवार बुलेटवरून खाली पडले मात्र, बुलेट चालकाविना महामार्गावरून तशीच सुमारे तीनशे फूट पुढे गेली. त्यानंतर एक जीपला आडवी जाऊन महामार्गाच्याकडेला जाऊन खाली पडली.

चालकाविना धावणारी बुलेट पाहून प्रसंगवधान साधून चालकाने जीप थांबवल्याने अनर्थ टळला. मात्र यामुळे महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार काही क्षण पहिला मिळाला. ही घटना येथील परेरा पेट्रोल पंप येथील सीसीटीव्हीत कैद झाली.

या अपघातात पादचारी जनार्धन दत्तू गांजवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे हात व पाय फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती डॉ. हनुमंत भोसले यांनी दिली. या प्रकरणी माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT