Bullock sakal
पुणे

Electric Shock : बाणेर येथे विजेचा धक्का लागून गोऱ्ह (बैल) मृत्युमुखी

बाणेर येथील वीरभद्र नगर येथे (ता. 6) मंगळवार रोजी संध्याकाळी स्मार्ट सिटीकडून बसविलेल्या पथ दिव्याच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून दीड वर्षाच गोऱ्ह (बैल) मृत्युमुखी पडला.

शीतल बर्गे

बालेवाडी - बाणेर येथील वीरभद्र नगर येथे (ता. 6) मंगळवार रोजी संध्याकाळी स्मार्ट सिटीकडून बसविलेल्या पथ दिव्याच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून दीड वर्षाच गोऱ्ह (बैल )मृत्युमुखी पडला. दोन महिन्यापूर्वीच बालेवाडी येथे पथदिव्याचा विजेचा धक्का लागूनच एक महिला मृत्युमुखी पडली होती.

त्यामुळे हे ऐकून नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध च्या आपल्या संतप्त भावनांचा उद्रेक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेला पहायला मिळाला. बालेवाडी येथील रहिवासी संतोष सस्ते यांची बाणेर पाषाण रस्त्याजवळ गोशाळा असून त्यांच्याकडे बरीच गुरे आहेत. त्यातील काही गुरे दररोज या भागातील टेकडीवर चरतात.

परंतु (ता. ६) ऑगस्ट रोजी या गुरां पैकी काही गुरे ही बाणेर येथील वीरभद्र नगर परिसरामध्ये चरायला गेली. तिकडून संध्याकाळी सातच्या सुमारास घरी परत जात असताना, वीरभद्र नगर लेन नंबर ९ जवळील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या स्मार्ट सिटीने बसविलेल्या पथदिव्या जवळील एका अर्थिंगच्या पट्टीस बैलाचा स्पर्श होऊन तो जागेवरच खाली पडून गतप्राण झाला.

त्याला विजेचा धक्का बसल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच महावितरणला याबद्दल कळविण्यात आले. कर्मचाऱ्यांनी येऊन पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचली . काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर अनेकांनी आपल्या प्रशासनाविरुद्धचा आक्रोश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.

कारण दोन वर्षांपूर्वी ही एक गाय अशीच मृत्युमुखी पडली होती. तर दोन महिन्यापूर्वी बालेवाडी येथील स्मार्ट सिटीच्या पथ दिव्याचा विजेचा धक्का लागून एक महिला मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे प्रशासनाच्या बेजबाबदार पणाला आता या भागातील नागरिक कंटाळले आहेत असे बोलले जात आहे. या भागातील सगळ्याच पथदिव्यांची एकदा तपासणी करण्यात यावी अशी ही मागणी नागरीक करत आहेत.

माणसाच्या जीवाची प्रशासनाला किंमतच राहिलेली नाही असे वाटते आहे! प्रत्येक वेळेस माणूस गेला किंवा एखादी अशी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते का? असा सवाल या भागात राहणारे सारंग वाबळे यांनी विचारला आहे .

प्रशासनाच्या बेजवाबदार पणामुळे आज एक निष्पाप जीव गेला आहे. या ठिकाणाहून अनेक लहान मुले नागरिक ये-जा करत असतात ,किती मोठं संकट आज या बैलाने आपल्या अंगावर घेऊन नागरीकांचे प्राण वाचावले आहेत.तरी या भागातील सगळ्यात पथदिव्यांची पाहणी करण्यात यावी जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.

- मोनाली पवार, बाणेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT