Bullock Cart Race 
पुणे

शर्यती सुरू झाल्या पण हा दिवस पाहायला 'आमदार' आपल्यात नाही

लाडक्या बैलाच्या आठवणीने बैल गाडा मालक भावूक; समाधीपुढे नतमस्तक होऊन काढली बैलांची मिरवणूक

निलेश बोरुडे

किरकटवाडी: न्यायालयाने (Court) बैलगाडा शर्यतींवर (Bullock Cart Race) असलेली बंदी उठवली आणि अनेक वर्षांपासून या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाखो शेतकरी व बैलगाडा शर्यत प्रेमींनी सर्वत्र जल्लोष केला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड,किरकटवाडी व खडकवासला (Khadakwasla) येथील बैल मालकांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत बैलांची हलगीच्या तालात वाजत-गाजत मिरवणूक काढली होती.

खडकवासला येथील शंभू-बाजी बैलगाडा शर्यत गृपचे पै. निखिल कोरडे शर्यतींना न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर आपल्या लाडक्या बैलाच्या आठवणीने भावूक झाले, "लेकराप्रमाणे खोंड सांभाळलं. खुप जीव लावायचो. घरातील सर्वांना या देखण्या आणि चपळ खोंडाचा लळा लागला होता. गोठ्यावर येणारा मित्र परिवार त्याच्या रुपाकडे पाहत राहायचा. त्याचा रुबाब पाहून आम्ही त्याचे नाव 'आमदार' ठेवले. पाच लाखांच्या पुढे त्याला मागायचे पण बैल शर्यत गाजवणारा होता त्यामुळे त्याला कधीच विकायचे नाही असे ठरवले होते. दुर्दैवाने पाच महिन्यांपूर्वी त्याचे निधन झाले.आज शर्यती सुरू झाल्या आणि त्याच्या आठवणीने डोळ्यांत पाणी आले," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

खडकवासला येथील शंभू-बाजी गृपच्या 'आमदार' या बैलाचे 29 ऑगस्ट रोजी अचानक निधन झाले. त्याची आठवण म्हणून या बैलप्रेमींनी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सिंहगड सृष्टी येथे असलेल्या गोठ्यात या आमदाराची समाधी उभारली आहे. त्या समाधीवर देखणी प्रतिकृती बसविण्यात आली आहे. न्यायालयाने शर्यतींवरील बंदी उठविल्यानंतर कोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'आमदाराच्या' समाधीपुढे नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण केला व सध्या असलेल्या तीन शर्यतींच्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावेळी नांदेड सिटीचे संचालक अतुल कारले,प्रविण दसवडकर,किरण दसवडकर व शंभू-बाजी गृपचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT