Bullock cart race
Bullock cart race sakal
पुणे

मर्सिडीस नव्हे विमान बक्षीस जाहीर करायला हवे होते

सकाळ वृत्तसेवा

उंड्री - राणेंनी मर्सिडीस नव्हे, विमान बक्षीस जाहीर करायला हवे होते, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी नीतेश राणे यांना लगावला. शिवसेनेचा साधा कार्यकर्ता ट्रॅक्टर, बुलेटसारखी बक्षीसे देऊन बैलगाडा मालकांना प्रोत्साहन देत आहे. तानाजी सावंत भाजपबरेबर जाणार नाहीत, असे स्पष्ट मत अहिर यांनी व्यक्त केले.

होळकरवाडी (ता. हवेली) येथे कै. महाराष्ट्र केसरी नाग्या बैलाच्या द्वितीय स्मरणार्थ मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केले होते. साडेचारशेहून अधिक बैलगाडा मालकांनी शर्यतीमध्ये सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद, विद्या होडे, आदित्य शिरोडकर, विजय देशमुख, समीर तुपे, बाळासाहेब भानगिरे, राजीव भाडळे, संदीप मोडक, प्रमोद होले उपस्थित होते.

अहिर म्हणाले की, मुख्यमंत्री नावाने सुरू केलेली बैलगाडा शर्यत बैलगाडा मालकांना अभिमान वाटावी अशीच आहे. शैक्षणिक, क्रीडा आणि इतर स्पर्धांच्या माध्यमातून सामान्यांची नाळ जोडण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केले जात आहे. राज्यात समन्वय समिती असते, तशी समिती जिल्हा पातळीवर स्थापन केली, तर स्थानिक प्रश्न तेथेच सोडवले जातील. आघाडी झाल्यास अशी समन्वय समिती गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे म्हणाले की, महाराष्ट्रातून बैलगाडा मालक शर्यतीमध्ये सहभागी झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना समाधान वाटत आहे. नीतेश राणे मर्सिडीस दिली, तर त्यांच्या तोडीस तोड बैलगाडा मालकांना बक्षीस दिले जाईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडेल असे बक्षीस म्हणून ट्रॅक्टर दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT